अमेरिकन ओपन टेनिस : फेडरर, नदाल विजेतेपदाचे दावेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:53 AM2017-08-28T00:53:46+5:302017-08-28T00:53:52+5:30

अनेक दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत उद्या (सोमवार)पासून सुरू होण-या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत राफेल नदाल व रॉजर फेडरर हेच विजेतेपदाचे प्रमुख दावेदार असणार आहेत. त्याचबरोबर महिला गटात आठ खेळाडूंचे लक्ष विजेतेपदाबरोबरच...

American Open Tennis: Federer, Nadal Winners' Contender | अमेरिकन ओपन टेनिस : फेडरर, नदाल विजेतेपदाचे दावेदार

अमेरिकन ओपन टेनिस : फेडरर, नदाल विजेतेपदाचे दावेदार

Next

न्यूयॉर्क : अनेक दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत उद्या (सोमवार)पासून सुरू होण-या अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत राफेल नदाल व रॉजर फेडरर हेच विजेतेपदाचे प्रमुख दावेदार असणार आहेत. त्याचबरोबर महिला गटात आठ खेळाडूंचे लक्ष विजेतेपदाबरोबरच नंबर वन रॅँकिंगकडे असणार आहे.
नदाल व फेडरर या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. हे दोन्ही दिग्गज खेळाडू अमेरिकन ओपन स्पर्धेत आतापर्यंत एकमेकांविरुद्ध खेळलेले नाहीत. मात्र या वेळी उपांत्य फेरीच्या सामन्यात त्यांची लढत होऊ शकते. जागतिक क्रमवारीत दोन नंबरवर असलेला व २०१२ चा विजेता असलेल्या अ‍ॅँडी मरे याने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली. यामुळे नदाल-फेडरर यांच्या अंतिम लढतीची शक्यता संपुष्टात आली. अंतिम फेरीपूर्वीच त्यांच्यात लढत होणार आहे.
पाच वेळा यूएस ओपन जिंकणा-या फेडररने या वेळी विजेतेपद पटकावल्यास तो यूएस ओपन जिंकणारा सर्वांत जास्त वयाचा खेळाडू बनणार आहे. ज्वेरेव किर्गीयोस व डॉमनिक थिम या खेळाडूंनाही विजेतेपदाची संधी आहे.
महिला गटातील सामने रोमहर्षक होण्याची शक्यता आहे. सेरेना विल्यम्स व व्हिक्टोरिया अझारेंका स्पर्धेबाहेर असल्याने आठ खेळाडूंकडे नंबर वन बनण्याची संधी मिळणार आहे. मारिया शारापोव्हा डोपिंग प्रकरणानंतर प्रथमच ग्रॅँडस्लॅम स्पर्धेत उतरणार आहे. तिच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.
जागतिक क्रमवारीत नंबर वनवर असणा-या कॅरोलिना पिलिस्कोव्हाला आपले स्थान कायम ठेवणे सोपे असणार नाही. रोमानियाची सिमोना हालेप, डेन्मार्कची कॅरोलिना वॉझ्नियाकी, गर्बाइन मुगुरुजा, इलिना स्वेतलाना, जोहाना कोंटा व स्वेतलाना कुझ्नेत्सोवा यांनाही नंबर वन बनण्याची संधी आहे. व्हीनस विल्यम्स नवव्या स्थानी असून, तिलाही ही स्पर्धा जिंकण्याची संधी आहे. त्याचबरोबर अँजेलिक केर्बरही जेतेपदाची दावेदार आहे. 
 

Web Title: American Open Tennis: Federer, Nadal Winners' Contender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.