Ash Barty : एकेकाळी क्रिकेटच्या मैदानावर उतरलेल्या अॅश बार्टीनं जिंकली Australian Open; ४४ वर्षानंतर घडला इतिहास!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 04:29 PM2022-01-29T16:29:47+5:302022-01-29T23:59:31+5:30
Ash Barty has won the Australian Open singles tennis title - अॅश बार्टीनं शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे जेतेपद नावावर केले.
Ash Barty has won the Australian Open singles tennis title - अॅश बार्टीनं शनिवारी ऑस्ट्रेलियन ओपनटेनिस स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या बार्टीला अमेरिकेची प्रतिस्पर्धी डॅनिएले कॉलिन्सनं कडवी झुंज दिली. पण, १-५ अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना बार्टीनं ६-३, ७-६ ( ७-२) अशा फरकानं अंतिम सामना जिंकला. बिम्बल्डन आणि फ्रेंच ओपन स्पर्धेनंतर बार्टीचं हे तिसरं ग्रँड स्लॅम जेतेपद आहे.
Win a Grand Slam on home soil? Completed it mate 🇦🇺🏆@ashbarty defeats Danielle Collins 6-3 7-6(2) to become the #AO2022 women’s singles champion.
— #AusOpen (@AustralianOpen) January 29, 2022
🎥: @wwos • @espn • @eurosport • @wowowtennis#AusOpenpic.twitter.com/TwXQ9GACBS
२५ वर्षीय बार्टीनं या विजयासह ४४ वर्षांचा ऑस्ट्रेलियन टेनिसपटूचा दुष्काळ संपवला. १९७८साली ख्रिस ओ'निल यांच्यानंतर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकणारी बार्टी ही पहिलीच ऑसी खेळाडू आहे. बार्टीनं २०१९साली फ्रेंच आणि २०२१ मध्ये बिम्बल्डन स्पर्धा जिंकली होती. २०१४मध्ये बार्टीनं टेनिसमधून ब्रेक घेतला होता. तेव्हा ती महिला बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बन हिट्स संघाकडून खेळली होती. त्यानंतर २०१६मध्ये ती पुन्हा टेनिस कोर्टवर उतरली.
Champion!🏆 Time to Start the Barty Party🥳
Congratulations @ashbarty on becoming the first Aussie to win the @AustralianOpen in 44 years!#AusOpenpic.twitter.com/ad9aDxsAG3— Brisbane Heat (@HeatBBL) January 29, 2022
🖤💛❤️
The moment Evonne Goolagong Cawley crowned @ashbarty the #AusOpen women's singles champion 🏆#AO2022pic.twitter.com/ASBtI8xHjg— #AusOpen (@AustralianOpen) January 29, 2022