एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस : रिकार्डोकडून व्हेसलेला पराभवाचा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2018 01:10 AM2018-01-02T01:10:13+5:302018-01-02T01:10:19+5:30
स्पेनच्या रिकार्डो ओडेडा लाराने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून प्रजासत्ताकच्या व सहाव्या मानांकित जेरी व्हेसलेचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत पहिल्याच दिवशी खळबळजनक उडवून दिली.
पुणे : स्पेनच्या रिकार्डो ओडेडा लाराने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून प्रजासत्ताकच्या व सहाव्या मानांकित जेरी व्हेसलेचा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून एटीपी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेत पहिल्याच दिवशी खळबळजनक उडवून दिली. दुसरीकडे हंगेरीच्या मार्टन फुकोसिव्हिक्स, फ्रांसच्या पिएरे ह्युजूस हर्बर्ट या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून दुसºया फेरीत प्रवेश केला.
महाराष्टÑ टेनिस संघटनेच्यावतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरू झालेल्या या स्पर्धेत एकेरीत पहिल्या फेरीत स्पेनच्या रिकार्डो ओडेडा लाराने प्रजासत्ताकच्या व सहाव्या मानांकित जेरी व्हेसलेचा ६-३, ७-६ गुणांनी पराभवाचा धक्का दिला. हंगेरीच्या मार्टन फुकोसिव्हिक्स याने अर्जेंटिनाच्या निकोलस किकरचा ६-0, ६-३ असा सहज पराभव करून दुसरी फेरी गाठली.
अटीतटीच्या झालेल्या सामन्यात फ्रान्सच्या पिएरे ह्युजूस हर्बर्ट याने इटलीच्या मार्को चेचीनाटोचा टायब्रेकमध्ये ७-६(४), ६-७(६), ६-२ असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली. दुहेरीत पहिल्या फेरीत भारताच्या एन बालाजी व विष्णू वर्धन या जोडीला आदिल शमासदिन व निल स्कुप्सकी यांच्याकडून ३-६, ७-६, १0-६ असा पराभवाचा सामना करावा लागला.