ऑस्ट्रेलिया आग: फेडरर-नदालचं सामाजिक भान; पुनर्वसनासाठी करणार दान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 10:52 AM2020-01-08T10:52:26+5:302020-01-08T10:53:02+5:30
ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या भीषण आगीनं 50 कोटीहून अधिक वन्य जीवांचे प्राण घेतले
ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या भीषण आगीनं 50 कोटीहून अधिक वन्य जीवांचे प्राण घेतले. ही आग आटोक्यात आणण्याचे अजूनही प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येकजण आपापल्या परीनं पीडितांना मदत करत आहेत. क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनीही पुनर्वसनासाठी पुढाकार घेतला आहे आणि आता त्यात टेनिसपटूंचाही समावेश झाला आहे. दिग्गज टेनिसपटूरॉजर फेडरर, राफेल नदाल आणि सेरेना विल्यम्स यांनी सामाजिक भान राखताना पुनर्वसनासाठी दान करण्याचा निर्णय घेतला आहे.
So excited to announce the world's best players will be at AO Rally for Relief.
— #AusOpen (@AustralianOpen) January 8, 2020
Grab your tickets to see @rogerfederer, @RafaelNadal, @serenawilliams, @naomiosaka, @CaroWozniacki, @NickKyrgios, @StefTsitsipas and more!#Aces4BushfireReliefhttps://t.co/ioWWblwN3Epic.twitter.com/TsS2sQXIbb
ऑस्ट्रेलिया आगीत मोडलेला संसार पुन्हा उभा करण्यासाठी क्रीडा विश्व एकवटले आहे. टेनिस ऑस्ट्रेलियानंही पुढाकार घेताना पुनर्वसनासाठी दिग्गज खेळाडूंच्या प्रदर्शनीय सामन्याचे आयोजन केले आहेत. या सामन्यात फेडरर, नदार, सेरेना यांच्यासह अनेक अव्वल खेळाडू खेळणार आहेत. 15 जानेवारीला होणाऱ्या या सामन्यातून उभा राहणारा निधी ऑस्ट्रेलिया आगीतील पीडितांच्या पुनर्वसनासाठी देण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियातील टेनिसला वेगळी ओळख मिळवून देणारा निक किर्गिओसही या सामन्यात खेळणार आहेत. त्याच्यासह ग्रँड स्लॅम विजेती नाओमी ओसाका आणि कॅरोलिन वॉझ्नीआकी, तर स्टीफनोस त्सीत्सीपास हाही खेळणार आहे.
''जवळपास दोन ते अडीच तास चालणाऱ्या या सामन्यातून आम्ही जास्तीतजास्त निधी गोळा करणार आहोत. सामाजिक भान राखून आम्ही सर्व एकत्र येत आहोत,'' असे टेनिस ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी क्रेग टिली यांनी सांगितले.