आॅस्ट्रेलियन ओपन : जोकोच्या स्वप्नांचा चुराडा! कोरियन ह्युयांग चुंगने केले स्पर्धेबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 01:58 AM2018-01-23T01:58:22+5:302018-01-23T01:58:32+5:30
पहिला सेट संघर्ष करीत जिंकला खरा; पण २१ वर्षीय कोरियन ह्युयांग चुंगने सहा वेळचा विजेता सर्बियाच्या नोवाक जोकोवीचला सामना जिंकू दिला नाही.
मेलबर्न : पहिला सेट संघर्ष करीत जिंकला खरा; पण २१ वर्षीय कोरियन ह्युयांग चुंगने सहा वेळचा विजेता सर्बियाच्या नोवाक जोकोवीचला सामना जिंकू दिला नाही. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात ह्युयांगने जोकोचा ७-६, ७-५, ७-६ गुणांनी पराभव करून आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खळबळ उडवून दिली. याबरोबच जोकोच्या स्वप्नांचा चुराडा झाला. चौथ्या फेरीत जोको एक्स्प्रेस थांबली.
गतविजेता रॉजर फेडरर आणि टॉमस बर्डीच यांनी सरळ सेटमध्ये विजय नोंदवले. ‘फेड एक्स्प्रेस’ (फेडरर) जलदगतीने धावत आहे.त्याला विजयाचा दावेदार मानला जात आहे. साजेशी कामगिरी करीत स्वित्झर्लंडच्या फेडररने स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. माजी विजेत्या एंजेलिक कर्बर आणि मेडिसन किज यांनी महिला गटातील उपांत्यपूर्व फेरी गाठली.
फेडररचा एक वेळ ट्रेनिंग जोडीदार म्हणून राहिलेल्या हंगेरीच्या मार्टन फुसोविक्स ६-४, ७-६, ६-२ ने पराभूत झाला. मेलबर्न पार्कवरील फेडररचा हा १४ वा विजय ठरला. ३६ वर्षीय फेडररने २०१५ हे वर्ष सोडले तर २००४ पासून आॅस्ट्रेलियन ओपनच्या कमीत कमी उपांत्यपूर्व फेरीपर्यंतचा प्रवास गाठण्यात यश मिळवले आहे. १९ वेळा ग्रॅण्डस्लॅम चॅम्पियन असलेला फेडरर हंगेरीच्या खेळाडूबद्दल म्हणाला, की
तो चांगला खेळला. आज
चांगले नियोजन आणि त्याचा अवलंब करण्याची गरज होती. मी विजयानंतर आनंदी आहे.
आता फेडररचा सामना बर्डीचविरुद्ध होईल. ज्याने इटलीच्या फाबियो फोगनीनीचा सरळ सेटमध्ये पराभव केला. ३२ वर्षीय बर्डीचला गेल्या वर्षी तिसºया फेरीत फेडररकडून पराभूत व्हावे लागले होते. आता त्याला चांगल्या कामगिरीची आशा आहे. मी सर्वेश्रेष्ठ कामगिरीचा प्रयत्न करीन, असे बर्डीचने सांगितले.
बोपन्ना, शरण यांचा पराभव
भारताचा रोहन बोपन्ना आणि दिविज शरण यांना आपल्या जोडीदारांसह आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. तिसºया फेरीतून भारतीय जोडी बाहेर पडली. बोपन्नाने फ्रान्सच्या एडवर्ड रॉजर वेस्लिनसोबत जोडी बनवली होती. त्यांना आॅस्ट्रियाच्या ओलिवर मराच आणि क्रोएशियाच्या मॅट पाविचकडून ४-६, ७-६, ३-६ पराभूत व्हावे लागले.शरण आणि अमेरिकेचा राजीव राम या जोडीला पोलंडच्या लुकास कुबोट ब्राझिलच्या मार्सेलोे मेलोकडून ६-३, ६-७, ४-६ ने पराभूत व्हावे लागले.
कर्बरने
गाळला घाम
महिला गटातील चौथ्या फेरीतील सामन्यात एंजेलिक कर्बरला विजयासाठी घाम गाळावा लागला. २१ वर्षीय या खेळाडूने पहिला सेट गमावल्यानंतर पुनरागमन केले. तिने तायवानच्या बिनमानांकित सीह सू वेई हिचा ४-६, ७-५, ६-२ ने पराभव केला.