आॅस्ट्रेलियन ओपन - फेडररची विजयी सलामी, वावरिंकाचाही विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 03:11 AM2018-01-17T03:11:50+5:302018-01-17T03:13:24+5:30
गतविजेत्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत शानदार सुरुवात केली. अपेक्षेप्रमाणे फेड एक्स्प्रेस नावाने प्रसिद्ध असलेल्या फेडररने पहिल्या फेरीत विजय मिळवला.
मेलबार्न : गतविजेत्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत शानदार सुरुवात केली. अपेक्षेप्रमाणे फेड एक्स्प्रेस नावाने प्रसिद्ध असलेल्या फेडररने पहिल्या फेरीत विजय मिळवला. त्याने अल्जात बेडेन याचा सरळ सेटमध्ये पराभव केला. २०१४ चा विजेता असलेला आणि सध्या दुखापतीतून पुनरागमन करीत असलेला स्वित्झर्लंडचा स्टान वावरिंका याने लिथुआनियाच्या रिकार्ड्स बेरांकिसचा ६-३, ६-४, २-६, ७-६ ने पराभव केला.
२० वे ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याच्या इराद्याने उतरलेल्या फेडररने आज जबरदस्त खेळ केला. त्याने स्लोवेनियाच्या खेळाडूचा एक तास ३९ मिनिटांत पराभव केला. हा सामना त्याने ६-३, ६-४, ६-३ अशा सेटने जिंकला.
विजयानंतर ३६ वर्षीय फेडरर म्हणाला, की या
वयात स्पर्धा जिंकण्याच्या फेव्हरेटमध्ये मी नाही. माझे स्वप्न हे अधिक खेळण्याचे आहे आणि आपल्याकडे असे खेळाडू आहेत जे खूप काळ खेळले आहेत. त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळते.
फेडररचा पुढील सामना जर्मनीच्या जॉन स्टफ्फविरुद्ध होणार आहे. दुसरीकडे, वावरिंका याला विजयासाठी २ तास ४७ मिनिटे संघर्ष करावा लागला.
शारापोव्हा,
केर्बरची आगेकूच
माजी चॅम्पियन आणि टेनिससुंदरी असलेल्या रशियाच्या मारिया शारापोव्हा आणि अँजेलिक केर्बर यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत आॅस्ट्रेलियन ओपनच्या दुसºया फेरीत धडक दिली. कॅनडाचा मिलोसरॉनिक मात्र पराभूत झाला. डोपिंगच्या कारणामुळे १५ महिन्यांच्या बंदीचा फटका सहन केल्यानंतर शारापोव्हा कोर्टवर उतरली. ती आपल्या जुन्या फॉर्ममध्ये दिसून आली. २००८ मध्ये विजेतेपद पटकाविलेल्या शारापोव्हाने ततयाना मारिया हिचा ६-१, ६-४ सेटने पराभव केला. आता तिचा पुढील सामना १४ वी मानांकित लाटवियाच्या अनास्तासिया सेवास्तोवा किंवा अमेरिकेच्या वारवारा लेपचेंका यांच्याविरुद्ध होईल. जगातील नंबर वन खेळाडू केर्बरने अन्ना लीना फ्राईडसॅमचा ६-०, ६-४ असे सेट जिंकून पराभव केला.
जोकोविच दुसºया फेरीत
सहा वेळचा चॅम्पियन नोव्हाक जोकोविचने अमेरिकेच्या डोनाल्ड यंग याचा ६-१, ६-२, ६-४ ने पराभव केला. याबरोबरच त्याने दुसºया फेरीत धडक दिली. माजी नंबर वन खेळाडू असलेला सर्बियाचा जोकोविच हा सहा महिन्यांपासून टेनिसपासून दूर होता. आता त्याचा पुढील सामना फ्रान्सच्या गाएल मोंफिल्स किंवा स्पेनच्या जोअमे मुनार यांच्याविरुद्ध होईल.
...हिच्या ओरडण्याचे काही तरी करा!
मेलबार्न : आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या दिवशी अमेरिकेच्या कोको वांदेवेघेच्या केळी हट्टाची चर्चा राहिली तर आज दुसºया दिवशी बेलारूसच्या एरिना साबालेंकाच्या सामन्यादरम्यानच्या जोरदार आवाजाची चर्चा राहिली. ही १९ वर्षीय बेलारशियन खेळाडू आॅस्ट्रेलियाच्या अॅशली बार्टीकडून तीन सेटमध्ये पराभूत झाली, परंतु तिच्या खेळापेक्षा प्रत्येक फटक्यावेळी ती करणाºया जोरदार आवाजाचीच चर्चा राहिली. साबालेंकाच्या आवाजापायी प्रेक्षकही एवढे हैराण झाले,
की त्यांनी नंतर-नंतर तिच्या ओरडण्याचीच नक्कल करायला सुरुवात केली आणि पंचांना सामन्यादरम्यान शांतता
राखण्याचे वारंवार आवाहन करावे लागले.
साबालेंकाचा हा आवाज टिष्ट्वटरवरही ट्रेंडिंग राहिला. बºयाच माजी टेनिसपटूंनी तिच्या आवाज करण्याच्या सवयीबद्दल कॉमेंट टाकल्या. पॅम श्रायव्हर म्हणाली, की साबालेंका ३४७ प्रकाराचे वेगवेगळे आवाज काढू शकते ही खरोखरच विलक्षण टॅलेंट आहे.