आॅस्ट्रेलियन ओपन : मरे, निशिकोरी दुखापतीमुळे बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 01:04 AM2018-01-05T01:04:16+5:302018-01-05T01:04:24+5:30
अव्वल टेनिसपटू अॅँडी मरे, जपानचा केई निशिकोरी यांनी दुखापतीमुळे आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. तर नोवाक जोकोविच या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी एका प्रदर्शनीय सामन्यात खेळणार आहे.
मेलबोर्न - अव्वल टेनिसपटू अॅँडी मरे, जपानचा केई निशिकोरी यांनी दुखापतीमुळे आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. तर नोवाक जोकोविच या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी एका प्रदर्शनीय सामन्यात खेळणार आहे. त्यानंतरच तो निर्णय घेणार आहे.
मरे विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीनंतर मैदानात उतरलेला नाही. तो म्हणाला, ‘मला मेलबोर्नमध्ये खेळता येणार नाही, याचे खूप दु:ख आहे. मी अद्याप स्पर्धेसाठी तयार नाही.’ आशियाचा अव्वल टेनिसपटू निशिकोरीला सिनसिनाटी येथे सरावादरम्यान दुखापत झाली आहे.
१५ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत सहभागी होणार नसल्याची घोषणा निशिकोरी याने आपल्या वेबसाईटवर केली. तो म्हणाला, ‘आॅस्ट्रलिया माझे आवडते ठिकाण आहे. मात्र, मला येथे खेळता येणार नाही, याचे दु:ख आहे.
दरम्यान, जोकोविचचाही या स्पर्धेतील सहभाग अनिश्चित आहे. विम्बल्डनमधून दुखापतीमुळे माघार घेतल्यानंतर जोकाविच मैदानात उतरलेला नाही. या स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी एका प्रदर्शनीय सामन्यात खेळणार आहे. (वृत्तसंस्था)