ऑस्ट्रेलिया ओपन : पुन्हा एकदा पाच सेट्सचा थरार अन् रॉजर फेडररची उपांत्य फेरीत एन्ट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 01:28 PM2020-01-28T13:28:16+5:302020-01-28T13:29:15+5:30
दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररचे टाय ब्रेकरमध्ये जबरदस्त पुनरागमन
दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररनंऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम स्पर्धेत आणखी एका पाच सेटमध्ये रंगलेल्या थरारक सामन्यात बाजी मारली. सहा वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱ्या 38 वर्षीय फेडररनं पुन्हा एकदा आपल्या अनुभवाच्या जोरावर 28 वर्षीय टेन्नीस सँडग्रेनला हार मानण्यास भाग पाडले. 1-2 अशा पिछाडीवरून फेडररनं हा सामना 6-3, 2-6, 2-6, 7-6 ( 10-8), 6-3 असा जिंकला. फेडररनं 3 तास 31 मिनिटांत हा सामना जिंकला.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या फेडररनं पहिला सेट 6-3 असा सहज घेतला. पण, त्यानंतर अमेरिकेच्या खेळाडूनं जबरदस्त कमबॅक केला. जागतिक क्रमवारीत शंभराव्या स्थानावर असलेल्या सँडग्रेननं पुढील दोन्ही सेट घेत 2-1 अशी आघाडी घेतली. चौथा सेट अत्यंत चुरशीचा झाला. टाय ब्रेकरमध्ये झालेल्या या सेटमध्ये फेडरर 3-6 असा पिछाडीवर होता. त्यामुळे त्याचा पराभव निश्चित मानला जात होता. पण, सर्वांना नेहमीच अचंबित करणाऱ्या फेडररनं याही वेळेस तेच केले.
टाय ब्रेकरमध्ये त्यानं 3-6 अशा पिछाडीवरून मारलेली मुसंडी सर्वांना थक्क करणारी होती. त्यानं सर्व अनुभव पणाला लावताना टाय ब्रेकरचा सेट 6-6 असा बरोबरीत आणला आणि त्यानंतर तो 10-8 असा जिंकून सामन्यात बरोबरी साधली. फेडररनं 460वेळा टाय ब्रेकरचा सेट जिंकला आहे. या विजयानं फेडररचा आत्मविश्वास वाढलाच, शिवाय सँडग्रेनचे खच्चीकरणही झाले. त्याचाच फायदा घेत फेडररनं निर्णायक सेट 6-3 असा जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. फेडररनं 15वेळा ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
Federer finds a way 🇨🇭@rogerfederer saves seven match points to def. Tennys Sandgren 6-3 2-6 2-6 7-6(8) 6-3 and reach the #AusOpen semifinals for the 15th time.#AO2020pic.twitter.com/B3Biy3q1Ez
— #AusOpen (@AustralianOpen) January 28, 2020
"I think I got incredibly lucky."
— #AusOpen (@AustralianOpen) January 28, 2020
Luck or not, here's how @rogerfederer assessed his performance to advance to the #AO2020 semifinals.#AusOpenpic.twitter.com/MK8UDBxT9o