ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा, राफेल नदाल उपांत्य फेरीत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 04:12 AM2019-01-23T04:12:33+5:302019-01-23T04:12:40+5:30
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला तर महिला विभागात पेत्रा क्विटोवा अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली.
मेलबोर्न : राफेल नदालने चमकदार कामगिरी कायम राखताना काही आघाडीच्या खेळाडूंना गाशा गुंडाळण्यास भाग पाडणाऱ्या फ्रांसेस टिफोऊचा मंगळवारी सहज पराभव करीत ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला तर महिला विभागात पेत्रा क्विटोवा अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरली.
नदालने टिफोऊचा केवळ १०७ मिनिटांमध्ये ६-३, ६-४, ६-२ ने पराभव केला. बिगरमानांकित टिफोऊने उपांत्यपूर्व फेरी गाठताना पाचव्या मानांकित केव्हिन अँडरसन व २० व्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्ह यांचा पराभव केला होता. युनानच्या या १४व्या मानांकित खेळाडूने चौथ्या फेरीत गतचॅम्पियन रॉजर फेडररचा पराभव केला होता. २० वर्षीय स्टीपासने उपांत्यपूर्व फेरीत स्पेनच्या २२व्या मानांकित रॉबर्टो बातिस्ता आगुटचा ७-५, ४-६, ६-४, ७-६(२) ने पराभव केला.
महिला एकेरीत चेक प्रजासत्ताकच्या आठव्या मानांकित पेत्रा क्विटोव्हाने उपांत्य फेरी गाठली. तिने उपांत्यपूर्व फेरीत आॅस्ट्रेलियाच्या १५ व्या मानांकित अॅशलीग बार्टीचा ६-१, ६-४ ने पराभव केला. क्विटोव्हाला उपांत्य फेरीत अमेरिकेच्या डेनिली रोज कोलिन्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. या बिगरमानांकित खेळाडूने रशियाच्या अनस्तेसिया पावलिचेनकोव्हाची झुंज २-६, ७-५, ६-१ ने मोडून काढली.
१८ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावण्यास उत्सुक असलेल्या नदालचे लक्ष सर्व ग्रँडस्लॅम स्पर्धेत प्रत्येकी दोनदा विजेतेपद मिळवणारा चौथा खेळाडू ठरण्यावर केंद्रित झाले आहे. ओपन युगात एकाही खेळाडूला हा पराक्रम करता आलेला नाही.
आॅस्ट्रेलियन ओपनमध्ये यापूर्वी २००९ मध्ये एकमेव विजेतेपद पटकावणारा नदाल म्हणाला, ‘या स्पर्धेत मला माझ्या पूर्ण कारकीर्दीत काही अडचणींना सामोरे जावे लागले. त्यामुळे आजच्या कामगिरीमुळे मी खूश आहे.’
>लिएंडर पेस - स्टोसूर जोडी ‘आऊट’
मेलबोर्न : अनुभवी लिएंडर पेस व त्याची सहकारी समांथा स्टोसूर यांना आॅस्ट्रेलियन ओपनच्या दुसºया फेरीत मंगळवारी पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
मिश्र दुहेरीत पेस-स्टोसूर या बिगरमानांकित जोडीने कोलंबियाच्या रोबर्ट फराह व जर्मनीच्या एना-लेना ग्रोनफोल्ड या जोडीविरुद्ध पहिला सेट ६-४ ने जिंकल्यानंतर दुसरा सेट या फरकाने गमावला. तिसरा सेट टायब्रेकपर्यंत लांबला. त्यात भारत-आॅस्ट्रेलिया जोडीला ८-१० ने पराभव स्वीकारावा लागला.
च्पेस-स्टोसूर जोडीने पहिल्या फेरीत नेदरलँडच्या वेस्ले कोलहोफ व चेक प्रजासत्ताकच्या कवेटा पेश्के जोडीचा सरळ सेट््समध्ये ६-४, ७-५ ने पराभव केला होता.
च्या स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे आव्हान पहिल्याच दिवशी संपुष्टात आले होते.