रॉजर-वेसलीनबरोबर जोडी बनवणार - बोपन्ना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 05:20 IST2017-11-25T05:20:41+5:302017-11-25T05:20:58+5:30
बंगळुरू : २०१८ च्या सत्रात जगातील २६ व्या क्रमांकाचा खेळाडू एडवर्ड रॉजर - वेसेलीन यांच्यासोबत आपण पुढच्या सत्रात जोडी बनवणार असल्याचे भारताचा आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपन्ना याने सांगितले.

रॉजर-वेसलीनबरोबर जोडी बनवणार - बोपन्ना
बंगळुरू : २०१८ च्या सत्रात जगातील २६ व्या क्रमांकाचा खेळाडू एडवर्ड रॉजर - वेसेलीन यांच्यासोबत आपण पुढच्या सत्रात जोडी बनवणार असल्याचे भारताचा आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपन्ना याने सांगितले. बोपन्ना पत्रकारांशी बोलताना म्हणाला की, ‘वेसेलीनला निवडण्याचे कारण आहे की त्याने दुहेरीवर पूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. पाब्लोचे लक्ष एकेरीवर आहे. याआधीदेखील मी असा खेळाडू निवडण्याचा प्रयत्न केला होता, जो फक्त दुहेरीत खेळतो. त्यामुळे या सत्रात वेसेलीनसोबत जोडी बनवण्याचा निर्णय घेतला आहे.’
३६ वर्षांच्या भारतीय खेळाडूचे विश्व रँकिंगमध्ये १८ वे स्थान आहे. गेल्या सत्रात त्याने उरुग्वेच्या क्युवाससोबत जोडी बनवली होती. त्याने फ्रेंच ओपन मिश्र दुहेरीतील ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद मिळवले. तर बोपन्नाने पहिला मेजर किताब कॅनडाच्या गॅब्रिएला गाब्रोवस्कीसोबत जिंकला होता. (वृत्तसंस्था)