चायना ओपन बॅडमिंटन : सायना, सिंधू, प्रणॉय पुढच्या फेरीत; लीन डॅन पहिल्याच फेरीत पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:59 AM2017-11-16T00:59:37+5:302017-11-16T01:00:21+5:30

पाचवेळचा जागतिक आणि दोन वेळचा आॅलिम्पिक चॅम्पियन चीनच्या लीन डॅनचा चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत खळबळजनक पराभव झाला.

 China Open Badminton: Saina, Sindhu, Prannoy in the next round; Lean Dan lost in the first round | चायना ओपन बॅडमिंटन : सायना, सिंधू, प्रणॉय पुढच्या फेरीत; लीन डॅन पहिल्याच फेरीत पराभूत

चायना ओपन बॅडमिंटन : सायना, सिंधू, प्रणॉय पुढच्या फेरीत; लीन डॅन पहिल्याच फेरीत पराभूत

Next

फुजोउ : पाचवेळचा जागतिक आणि दोन वेळचा आॅलिम्पिक चॅम्पियन चीनच्या लीन डॅनचा चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत खळबळजनक पराभव झाला. दखल घेण्याची बाब म्हणजे तब्बल ७ मॅच पॉइंट वाचवल्यानंतर लीनला पहिल्याच फेरीत आपला गाशा गुंडाळावा लागला. इंडोनेशियाचा जागतिक क्रमवारीत १७व्या स्थानी असलेल्या जोनाथन ख्रिस्टी याने लीनला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. भारतीयांमध्ये सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि एच. एस प्रणॉयने अपेक्षित कामगिरी करताना विजयी सलामी दिली.
जोनाथनने दोन गेमपर्यंत रंगलेल्या रोमांचक सामन्यात खळबळ माजवताना बलाढ्य लीनचे २१-१९, २१-१६ असे आव्हान संपुष्टात आणले. दरम्यान, या पराभवानंतर लवकर हा दिग्गज खेळाडू आपल्या निवृत्तीची घोषणा करेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाचवेळा चायना ओपनचे जेतेपद उंचावलेल्या अनुभवी लीनकडून या सामन्यात अनेक चुका झाल्या. याचा पुरेपूर फायदा घेताना जोनाथनने ४२ मिनिटांमध्येच लीनला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. मलेशियाच्या ली चोंग वेई याने मात्र सहज विजयी सलामी देत तैवानच्या सुह जेनहाओ याचा २१-५, २१-७ असा फडशा पाडला.
भारतीयांमध्ये सायनाने अमेरिकेच्या बेइवान झैंग हिला केवळ ३० मिनिटांमध्ये २१-१२, २१-१३ असे नमवून शानदार आगेकूच केली. पुढील फेरीत सायनापुढे पाचव्या मानांकीत अकाने यामागुची हिचे तगडे आव्हान असेल. स्टार शटलर सिंधूला विजयी सलामी देण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागली. ५९ मिनिटांपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात
सिंधूने जपानच्या १३ क्रमांकाच्या सयाका सातोला २४-२२, २३-२१ असे नमवले. पुरुषांच्या गटात भारतीय खेळाडू प्रणॉयने पिछाडीवरुन
बाजी मारताना कोरियाच्या ली डोंग क्युन याला १८-२१, २१-१६, २१-१९ नमविले़ (वृत्तसंस्था)
दुहेरीतही भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष जोडीला पहिल्या फेरीतून आपला गाशा गुंडाळावा लागला. चीनच्या चेंग ल्यू - नान झँग यांनी भारतीय जोडीचा २१-१३, २१-१३ असा सरळ दोन गेममध्ये सहज पराभव केला.

Web Title:  China Open Badminton: Saina, Sindhu, Prannoy in the next round; Lean Dan lost in the first round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.