Coronavirus: उपाशी पोटी झोपी नका, मला मेसेज करा; बेशिस्त अन् बेलगाम म्हणून कुप्रसिद्ध खेळाडूची दिलदारी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 01:36 PM2020-04-07T13:36:03+5:302020-04-07T13:39:07+5:30
CoronaVirus: क्रीडाविश्वात अनेक खेळाडूंनी आर्थिक मदत केलीय, तर अनेकांनी गरीब कुटुंबांच्या पालनपोषणाची जबाबदारी उचलली आहे.
एखाद-दुसऱ्या देशातच नव्हे, तर अख्ख्या जगातच कोरोना व्हायरसने दहशत निर्माण केली आहे. 'कोव्हीड १९' च्या जगभरातील रुग्णांची संख्या १३ लाखांहून अधिक आहे आणि ७४ हजारपेक्षा अधिक जणांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रत्येक देश या विषाणूला हरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतोय आणि या लढाईत प्रत्येक देशवासीय आपापलं योगदान देत आहे. भारतात जसे उद्योगपती, नेतेमंडळी, सेलिब्रिटी, खेळाडूंपासून जनसामान्यांपर्यंत सगळेच 'मिशन कोरोना'साठी सरसावलेत, तसंच चित्र जगभरात पाहायला मिळतंय.
क्रीडाविश्वात अनेक खेळाडूंनी आर्थिक मदत केलीय, तर अनेकांनी गरीब कुटुंबांच्या पालनपोषणाची जबाबदारी उचलली आहे. या दानशूर, मोठ्या मनाच्या क्रीडापटूंमध्ये आता ऑस्ट्रेलियाचा टेनिसस्टार निक किर्गियोसचं नावही जोडलं गेलंय. खरं तर, अत्यंत बेशिस्त, बेलगाम, आक्रस्ताळ्या वर्तनासाठी निक किर्गियोस कुप्रसिद्ध आहे. त्यानं अनेकदा आपल्या वागण्या-बोलण्यातून प्रतिस्पर्धी खेळाडूंचा अपमान केलाय, अनेकांना दुखावलं आहे. अर्थात, काही वेळा माफीही मागितलीय, पण त्याची ओळख 'बॅड बॉय' अशीच आहे. मात्र, कोरोना संकटात त्यानं इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमधून त्याच्यातील 'गुड बॉय'चं दर्शन घडलंय.
पठाण बंधूंचे समाजकार्यात एक पाऊल पुढे; गरजूंसाठी दान केले 10 हजार किलो तांदूळ
सानिया मिर्झानं गरजूंसाठी जमा केले कोट्यवधी; मिताली राजचाही मदतीचा हात
हरभजन सिंग अन् त्याच्या पत्नीची समाजसेवा; 5000 कुटुंबांना पुरवणार रेशन
युवराज सिंगची पंतप्रधान सहाय्यता निधीत 50 लाखांची मदत
ऑस्ट्रेलियात कोरोनाचे ५,८९५ रुग्ण असून ४६ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक उद्योग, कारखाने, व्यवसाय बंद असल्यानं हातावर पोट असलेल्या कामगारांना दोन वेळचं जेवण मिळणंही कठीण झालंय. त्यांचं पोट भरण्यासाठी निक मैदानात उतरला आहे. 'कृपया रिकाम्या पोटी कुणीही झोपू नका. कुठलाही संकोच न करता, थेट मला मेसेज करा. माझ्याकडे जे आहे, ते तुमच्यासोबत शेअर करताना मला आनंदच होईल. नूडल्सचा बॉक्स असो, ब्रेड असो किंवा दूध; मी तुमच्या घरी पोहोचवेन', अशी काळजाला भिडणारी पोस्ट निकनं केली आहे. ही पोस्ट तब्बल ९० हजारांहून अधिक जणांनी 'लाईक' केलीय.
कोरोना Vs. जग... क्रीडापटूंचा मदतीचा हात
क्रीडापटूंचा पुढाकार; जाणून घ्या कोणी केलं किती दान!
सचिन तेंडुलकरची राज्य अन् केंद्र सरकारला लाखोंची मदत
'गोल्डन गर्ल' Hima Dasचा पुढाकार; राज्य सरकारला दिला एका महिन्याचा पगार
वर्ल्ड कप जर्सीचा लिलाव करून देशाला मदत करतोय इंग्लंडचा क्रिकेटपटू
अमेरिकेत स्थायिक असूनही देशाच्या मदतीसाठी धावला; क्रिकेटपटूनं घेतली 2000 कुटुंबांची जबाबदारी
देशवासीयांसाठी तब्बल 90 कोटी निधी गोळा करण्याचा 'लाल बादशाह'चा संकल्प!
आफ्रिदीनंतर बांगलादेशच्या कर्णधारानं घेतली 300 गरीब कुटुंबांची जबाबदारी
21 वर्षीय टेनिसपटूची समाजसेवा; गरजूंना वाटतेय जीवनावश्यक वस्तू