जोकोविच अव्वल दहामध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:37 PM2018-07-16T23:37:41+5:302018-07-16T23:38:44+5:30

सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने चौथ्यांदा विम्बलडन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावताना ताज्या एटीपी रँकिंगमध्ये अव्वल १० मध्ये पुनरागमन केले आहे.

Djokovic top ten | जोकोविच अव्वल दहामध्ये

जोकोविच अव्वल दहामध्ये

Next

लंडन : सर्बियाचा दिग्गज टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने चौथ्यांदा विम्बलडन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावताना ताज्या एटीपी रँकिंगमध्ये अव्वल १० मध्ये पुनरागमन केले आहे.
अंतिम सामन्यात केव्हिन अँडरसनचा ६-२, ६-२, ७-६ (७-३) असा पराभव करताना विम्बलडनमध्ये पुरुष एकेरीत चौथ्यांदा विजेतेपद पटकावणाऱ्या जोकोविचने ११ क्रमांकांनी झेप घेतली आहे. त्यामुळे तो रँकिंगमध्ये १० व्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी तो आठ महिन्यांपर्यंत अव्वल दहामधून बाहेर होता. दक्षिण आफ्रिकेच्या अँडरसनने तीन क्रमांकांनी झेप घेतली असून तो पाचव्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी जोकोविच आॅक्टोबर २०१७ मध्ये अव्वल दहामध्ये समाविष्ट होता. स्पेनचा राफेल नदाल (९३१० गुण) अव्वल स्थानावर कायम आहे. दुसºया क्रमांकावर रॉजर फेडरर (७०८०) आहे. अँडरसनने फेडररला मॅरेथॉन उपांत्यपूर्व फेरीत पराभूत केले होते.
सेरेनाची झेप
अमेरिकन दिग्गज खेळाडू सेरेना विलियम्सन विम्बलडन टेनिस स्पर्धेत उपविजेती राहिली. त्या बळावर तिने डब्ल्यूटीए रँकिंगमध्ये १५३ स्थानांनी झेप घेतली असून, ती अव्वल ३० मध्ये पोहोचण्यात यशस्वी ठरली.
सेरेना ने २८ व्या स्थानी झेप घेतली. मुलीच्या जन्मानंतर सेरेना पुनरागमन करताना चौथी स्पर्धा खेळत फायनलमध्ये धडक मारण्यात यशस्वी ठरली. अंतिम सामन्यात ती एंजलिक कर्बरविरुद्ध पराभूत झाली. कर्बरने सहा क्रमांकांनी झेप घेतली असून ती चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. सिमोना हालेप इंग्लंड क्लबमध्ये तिसºयाच फेरीत बाद झाली; परंतु त्यानंतरही ती अव्वल स्थानी कायम आहे.

Web Title: Djokovic top ten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tennisटेनिस