चाहत्याची लॉटरी; टेनिस सुंदरी 'डेट'वर जायला तयार झाली, पण एका विचित्र अटीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 02:40 PM2020-04-21T14:40:04+5:302020-04-21T14:41:48+5:30
लॉकडाऊन व्हायचंच होतं, तर बॉयफ्रेंडसोबत व्हायला आवडलं असतं, असं विधान काही दिवसांपूर्वी तिनं केलं होतं.
जगभरात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या 24 लाख 81,866 इतकी झाली आहे. त्यापैकी 1 लाख 70,455 जणांना प्राण गमवावे लागले, तर 6 लाख 51,542 जणं बरी झाली आहेत. अनेक देशांनी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे सर्वांना घरातच रहावे लागत आहे. त्यात अनेक क्रीडा स्पर्धाही रद्द झाल्यामुळे खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत आहेत. असाच एक संवाद टेनिस सुंदरी युजीन बूचार्डनं इंस्टाग्रामवरून साधला. हा संवाद सुरू असताना एका चाहत्याला लॉटरी लागली. बूचार्डनं त्या चाहत्यासोबत 'डेट'वर जाण्याचे कबुल केलं, परंतु एका विचित्र अटीवर...
लॉकडाऊनचा काळ कंटाळवाणा आहे. जर लॉकडाऊन व्हायचंच होतं, तर बॉयफ्रेंडसोबत व्हायला आवडलं असतं, असं विधान काही दिवसांपूर्वी बूचार्डनं केलं होतं. कॅनडाची ही स्टार खेळाडू अॅली लाफोर्ससोबत इंस्टाग्राम चॅट करत होती. त्या चर्चेदरम्यान बॉब नावाचा चाहता सातत्यानं मॅसेज पाठवत होता. त्यानं बूचार्डला डेटवर येण्यासाठी 400 पाऊंड देण्याची तयारी दर्शवली.
ती म्हणाली,''डेटवर येताना टॉयलेट पेपरचा रोल नक्की आण. कोरोना व्हायरसमुळे टॉयलेट पेपरचा तुटवडा जाणवत आहे. तसंच तू मला योग्य जोडीदार निवडण्यासाठीही मदत कर. मला सध्या जोडीदाराची गरज आहे.'' चाहत्यानंही बूचार्डच्या सर्व अटी लगेच मान्य केल्या.
हा चाहता येथेच थांबला नाही, त्यानं आणखी 800 पाऊंड देण्याचा प्रस्ताव ठेवला आणि डेटवर ब्रिटिश उच्चारण करणाऱ्यालाही आण, असे सांगितले. चाहत्याकडून येणारी ही मदत बूचार्डच्या हॉस्पिटलसाठी खर्च केली जाणार आहे. त्यामुळे बूचार्डनेही चाहत्याची विनंती मान्य केली.
यापूर्वीही बूचार्ड जॉन गोएहर्क या चाहत्यासोबत डेटवर गेली होती.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
लॉकडाऊनमध्ये फुटबॉलपटू ड्रोनने पाठवतोय 35 लाख कंडोम; कोरोना लढ्यात असाही हातभार
चीनमध्येही कमळ खुलणार; जगातील सर्वात मोठे स्टेडिअम बांधणार
ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या गर्लफ्रेंडला धक्का; 'Hotness' मध्ये 20 वर्षीय अभिनेत्रीनं टाकलं मागे
फुटबॉल विश्वाला धक्का; सामन्यासाठी सराव करताना 22 वर्षीय खेळाडूचा मृत्यु
10-11 वर्षांपूर्वीच दिलेला सल्ला, आता जगाला पटतंय महत्त्व; शोएब अख्तरचा दावा
भारतीय क्रिकेटपटूचे वडील करतायत रुग्णांची सेवा
Video : DJ ब्राव्होनं तयार केलं महेंद्रसिंग धोनीवर खास गाण; पाहा झलक