French Open 2021 : क्रेजिकोवा, पावलिचेनकोवा जेतेपदासाठी भिडणार, आज रंगणार अंतिम लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2021 05:43 AM2021-06-12T05:43:30+5:302021-06-12T05:45:35+5:30
French Open 2021 : जेतेपदासाठी तिला रशियाच्या अनस्तेसिया पावलिचेनकोवाविरुद्ध भिडावे लागेल. उपांत्य सामन्यात क्रेजिकोवाने मारिया सकारी हिचा ७-५, ४-६, ९-७ असा थरारक पराभव केला.
पॅरिस : झेक प्रजासत्ताकची बिगरमानांकित बारबोरा क्रेजिकोवा हिने अत्यंत थरारक सामन्यात मॅच पॉईंट वाचवून जबरदस्त पुनरागमन केले आणि फ्रेंच ओपन महिला एकेरीच्या अंतिम लढतीत धडक मारली. जेतेपदासाठी तिला रशियाच्या अनस्तेसिया पावलिचेनकोवाविरुद्ध भिडावे लागेल. उपांत्य सामन्यात क्रेजिकोवाने मारिया सकारी हिचा ७-५, ४-६, ९-७ असा थरारक पराभव केला.
सिटसिपास अंतिम फेरीत
- पाचव्या मानांकित स्टेफनोस सिटसिपासने सहाव्या मानांकित अलेक्सांद्र ज्वेवरेवचा ६-३, ६-३, ४-६, ४-६, ६-३ ने पराभव करीत फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. निर्णायक सेटपर्यंत रंगलेल्या या लढतीच्या निमित्ताने चाहत्यांना रंगतदार खेळ बघण्याची संधी मिळाली.
- सिटसिपासने पहिले दोन सेट जिंकत आघाडी घेतली होती, पण ज्वेवरेवने दमदार पुनरागमन करीत त्यानंतरचे दोन सेट जिंकले आणि २-२ अशी बरोबरी साधली. पाचव्या व निर्णायक सेटमध्ये पुन्हा एकदा सिटसिपासने वर्चस्व गाजवत बाजी मारली.