डेव्हिस कप प्लेआॅफ लढतीत कॅनडाविरुद्ध भारत १-२ ने पिछाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:22 AM2017-09-18T01:22:06+5:302017-09-18T01:22:22+5:30

डेव्हिस कप प्लेआॅफ लढतीत महत्त्वाच्या दुहेरीच्या सामन्यात रोहन बोपन्ना व पुरव राजा यांना पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारताच्या विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळवण्याच्या आशेला मोठा धक्का बसला आहे.

India lose 1-2 against Canada in Davis Cup Playoffs | डेव्हिस कप प्लेआॅफ लढतीत कॅनडाविरुद्ध भारत १-२ ने पिछाडीवर

डेव्हिस कप प्लेआॅफ लढतीत कॅनडाविरुद्ध भारत १-२ ने पिछाडीवर

Next


एडमन्टन : डेव्हिस कप प्लेआॅफ लढतीत महत्त्वाच्या दुहेरीच्या सामन्यात रोहन बोपन्ना व पुरव राजा यांना पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारताच्या विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळवण्याच्या आशेला मोठा धक्का बसला आहे.
बोपन्ना व राजा यांना २ तास ५२ मिनिटे रंगलेल्या लढतीत डॅनियल नेस्टर व वासेक पोसपिसिली यांच्याविरुद्ध ५-७, ५-७, ७-५, ३-६ ने पराभव स्वीकारावा लागला. भारताला आता १६ देशांच्या एलिट विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळवण्यासाठी परतीच्या एकेरीच्या दोन्ही लढतींमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे. एटीपी टूरमध्ये एकेरीतही खेळणारा २७ वर्षीय पोसपिसिली कोर्टवर उतरणारा एकमेव खेळाडू होता. त्याने बेसलाईनजवळ केलेला चमकदार खेळ निकालातील अंतर स्पष्ट करणारा ठरला.
पोसपिसिलीची त्याच्या कर्णधाराने एकेरीच्या लढतीसाठी निवड केली होती, पण त्याला दुहेरीत खेळविण्यात आले. त्याने चमकदार कामगिरी करीत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. कारण ४५ वर्षीय नेस्टर अनेकदा दडपणाखाली असल्याचे दिसून आले.
दिवीज शरणच्या साथीने सर्किटमध्ये चांगली प्रगती करणा-या राजाने नेटलगत शानदार खेळ केला. त्याचे व्हॉली विनर शानदार होते, पण सर्व्हिस व बेसलाईनजवळ खेळताना त्याच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आणि त्याची भारताला झळ बसली.
अखेरच्या क्षणी संघात स्थान मिळालेल्या राजाने पाच वेळा सर्व्हिस गमावली. त्यात पहिल्या दोन सेटमध्ये संघ ५-६ ने पिछाडीवर असताना सर्व्हिस गमावली. नेस्टरने २००८ व २००९ मध्ये सर्बियाच्या नेनाद जिमोनजिचच्या साथीने आणि पोसपिसिलीने २०१४ मध्ये ब्रिटनच्या जॅक सोकच्या साथीने विम्बल्डनचे जेतेपद पटकावले आहे. या लढतीत बोपन्नाला सर्वाेत्तम कामगिरी करता आली नाही, अशी कबुली भूपतीने या वेळी दिली. पहिल्या दिवशी भारतातर्फे एकेरीत विजय मिळवणारा रामकुमार रामनाथन आता एकेरीच्या परतीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत ५१ व्या स्थानावर असलेल्या डेनिस शापोवालोव्हविरुद्ध खेळेल तर भांबरीची लढत ब्रेडन शनूरविरुद्ध होईल. रामकुमार धक्कादायक निकाल नोंदविण्यात यशस्वी ठरला तर कॅनडा दुस-या लढतीत पोसपिसिलीला खेळविण्याची शक्यता आहे. रामकुमारसाठी त्याची सर्व्हिस व व्हॉली महत्त्वाच्या ठरणार असल्याचे भूपतीने म्हटले आहे.
>राजाचे अपेक्षित सहकार्य लाभले नाही
बोपन्ना वेगवान सर्व्हिससाठी ओळखला जातो, पण आज त्याला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. भारताने एकूण १२ दुहेरी चुका केल्या त्यात पाच चुका बोपन्नाने केल्या. दडपणाखाली बोपन्ना मात्र सर्व्हिस राखण्यात यशस्वी ठरला. त्याला राजाचे अपेक्षित सहकार्यही लाभले नाही आणि स्वत:चा खेळही उंचावता आला नाही.
आम्ही चांगली कामगिरी करीत सामन्यावर नियंत्रण मिळवण्याच्या स्थितीत होतो, पण त्याचा आम्हाला लाभ घेता आला नाही. विम्बल्डन चॅम्पियनविरुद्ध खेळताना जर संधीचा लाभ घेता आला नाही तर विजयाचे हकदार असूच शकत नाही.
- महेश भूपती

Web Title: India lose 1-2 against Canada in Davis Cup Playoffs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.