इंडियन वेल्स टेनिस; सेरेना - व्हिनस भिडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 01:38 AM2018-03-12T01:38:09+5:302018-03-12T01:38:09+5:30
टेनिसविश्वात दमदार पुनरागमन केलेल्या दिग्गज सेरेना विलियम्सने इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना तिस-या फेरीत धडक मारली आहे. विशेष म्हणजे आता तिस-या फेरीत तिचा सामना आपली मोठी बहिण व्हिनस विलियम्स विरुद्ध होणार असून या रोमांचक सामन्याची सर्व टेनिसप्रेमींना उत्सुकता लागली आहे.
इंडियन वेल्स (यूएस) : टेनिसविश्वात दमदार पुनरागमन केलेल्या दिग्गज सेरेना विलियम्सने इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेतील विजयी घोडदौड कायम राखताना तिस-या फेरीत धडक मारली आहे. विशेष म्हणजे आता तिस-या फेरीत तिचा सामना आपली मोठी बहिण व्हिनस विलियम्स विरुद्ध होणार असून या रोमांचक सामन्याची सर्व टेनिसप्रेमींना उत्सुकता लागली आहे.
२३ वेळच्या ग्रँडस्लॅम विजेत्या सेरेनाने आपल्य लौकिकानुसार विजयी कामगिरी करताना नेदरलँड्सच्या बर्टन्सला ७-६, ७-५ असे नमवले. दरम्यान, मुलीला जन्म दिल्यानंतर पुनरागमन करत असलेल्या सेरेनाला या विजयासाठी काहीसे झुंजावे लागले. तरीही तिने आपल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर बर्टन्सचे कडवे आव्हान टायब्रेकमध्ये परतावले. त्याचवेळी दुसरीकडे झालेल्या एकतर्फी सामन्यात दिग्गज व्हिनस विलियम्सने सहजपणे आगेकूच करताना रोमानियाच्या सोराना सर्स्टी हिचा केवळ ७९ मिनिटांमध्ये ६-३, ६-४ असा धुव्वा उडवला. (वृत्तसंस्था)
पुन्हा एकदा थरार
च्आता तिसºया फेरीत विलियम्स भगिनी एकमेकींविरुद्ध लढतील. व्हिनस आणि सेरेना दोघीही आपल्या शानदार कारकिर्दीमध्ये एकूण २८वेळा एकमेकींविरुद्ध भिडले आहेत.
च्गेल्याच वर्षी आॅस्ट्रे लियन ओपनच्या अंतिम फेरीत सेरेनाने व्हिनसचा ६-४, ६-४ असा पराभव करत जेतेपद पटकावले होते.
च्यानंतर सेरेना गर्भवती असल्याने टेनिसपासून दूर राहिली आणि त्यानंतर तिने पुनरागमन करत आपल्या पहिल्या स्पर्धेत छाप पाडली आहे. सेरेनाने विजयी कामगिरी करत यापुढच्या स्पर्धांतही आपला धडाका कायम राहिल, असा इशाराच दिला आहे.
सेरेना विलियम्स
एलिना स्वितोलिनाची विजयी आगेकूच
अन्य लढतीत चौथ्या मानांकीत एलिना स्वितोलिना हिने जर्मनीच्या मोना बार्थेल हिचा ६-४, ६-३ असा सहज पराभव करत दिमाखात तिसरी फेरी गाठली आहे. पुढील सामन्यात तिचा सामना कार्ला सुआरेजविरुद्ध होईल. कर्लाने तैवानच्या सिए सु वेई हिचा ६-४, २-६, ६-३ असा पराभव करत आगेकूच केली आहे.