इंडियन वेल्स टेनिस स्पर्धा : सेरेनाचे पुनरागमन, अर्थातच विजयासह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 01:58 AM2018-03-10T01:58:16+5:302018-03-10T01:58:16+5:30

सुमारे सव्वा वर्षाच्या खंडानंतर २३ वेळची ग्रॅण्ड स्लॅम विजेती खेळाडू सेरेना विल्यम्स हिने डब्ल्यूटीए टूरवर धडाक्यात पुनरागमन केले आहे. इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत तिने गुरुवारी जरिना डियासवर ७-५, ६-३ असा विजय मिळवला.

 Indian Wells Tennis Tournament: Serena's return; | इंडियन वेल्स टेनिस स्पर्धा : सेरेनाचे पुनरागमन, अर्थातच विजयासह

इंडियन वेल्स टेनिस स्पर्धा : सेरेनाचे पुनरागमन, अर्थातच विजयासह

googlenewsNext

इंडियन वेल्स, अमेरिका - सुमारे सव्वा वर्षाच्या खंडानंतर २३ वेळची ग्रॅण्ड स्लॅम विजेती खेळाडू सेरेना विल्यम्स हिने डब्ल्यूटीए टूरवर धडाक्यात पुनरागमन केले आहे. इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत तिने गुरुवारी जरिना डियासवर ७-५, ६-३ असा विजय मिळवला. सेरेना हिने २०१७ च्या आॅस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकल्यानंतर गर्भवती असल्याने ब्रेक घेतला होता.
तिने सप्टेंबरमध्ये मुलगी अ‍ॅलेक्सिस आॅलिम्पिया हिला जन्म दिला. मुलीच्या जन्मानंतर तिने पुनरागमन केले.
त्यावेळी स्टेडियममध्ये उपस्थित प्रेक्षकांनी तिचे टाळ्या वाजवून स्वागत केले. गेल्या १७ वर्षातील इंडियन वेल्समध्ये ही तिची तिसरी स्पर्धा आहे.
आता दुस-या फेरीत सेरेनाचा सामना २९ वी मानांकित किकी बर्टन्स हिच्यासोबत होईल. या सामन्यातही तिने विजय मिळवल्यास तिचा सामना मोठी बहीण व्हिनस हिच्यासोबत होऊ शकतो. आठव्या मानांकित व्हिनसला पहिल्या फेरीत बाय मिळाला. आता तिचा सामना रोमानियाच्या सोराना सर्स्टीसोबत होईल. हा सामना व्हिनसने जिंकल्यास दोन्ही बहिणी आमनेसामने येऊ शकतात. गेल्या महिन्यात दोन्ही बहिणी फेडरेशन कप स्पर्धेत सोबत खेळल्या होत्या
(वृत्तसंस्था)


 

 

Web Title:  Indian Wells Tennis Tournament: Serena's return;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.