Elena Rybakina, Wimbledon Final : मॉक्सोत जन्मलेल्या २३ वर्षीय एलेना रिबाकिनाने कजाकस्तानसाठी रचला इतिहास!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2022 09:07 PM2022-07-09T21:07:36+5:302022-07-09T21:08:21+5:30

Elena Rybakina, Wimbledon Final : मॉस्कोत जन्मलेल्या परंतु २०१८ पासून कजाकस्तानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एलेना रिबाकिनाने शनिवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेत इतिहास रचला.

Kazakhstan's Elena Rybakina comes back from a set down to beat Tunisian World No. 2 Ons Jabeur 3-6, 6-2, 6-2 to win her maiden Grand Slam title at Wimbledon | Elena Rybakina, Wimbledon Final : मॉक्सोत जन्मलेल्या २३ वर्षीय एलेना रिबाकिनाने कजाकस्तानसाठी रचला इतिहास!

Elena Rybakina, Wimbledon Final : मॉक्सोत जन्मलेल्या २३ वर्षीय एलेना रिबाकिनाने कजाकस्तानसाठी रचला इतिहास!

Next

Elena Rybakina, Wimbledon Final : मॉस्कोत जन्मलेल्या परंतु २०१८ पासून कजाकस्तानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एलेना रिबाकिनाने शनिवारी विम्बल्डनटेनिस स्पर्धेत इतिहास रचला. एलेनाने महिला एकेरिच्या अंतिम सामन्यात ट्युनिशियाच्या तिसऱ्या मानांकिन ओन्स जॅबीरवर ३-६, ६-२, ६-२ असा विजय मिळवून विम्बल्डन जेतेपदाची ढाल पटकावली. ओपन एरामध्ये ग्रास कोर्टवर जेतेपद पटकावणारी ती कजाकस्तानची पहिली महिला टेनिसपटू ठरली. या ओपन एरात तिच्या नावावर सर्वाधिक ३ जेतेपदं आहेत. २०११ साली पेट्रा क्वितोव्हा हिने विम्बल्डन जेतेपद पटकावले होते आणि तिच्यानंतर येथे जेतेपद पटकावणारी एलेना ही सर्वात युवा महिला टेनिसपटू ठरली.  

''या ऊर्जा वाढवणाऱ्या प्रेक्षकांसमोर खेळण्यास मिळाले, हे मी माझे भाग्य समजते. मी जेतेपद पटकावेन हा विचारही केला नव्हता. याचे श्रेय मी माझ्या टीमला देते, त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हते. सर्वात महत्त्वाचे माझ्या कुटुंबियांचे आभार,''अशी प्रतिक्रिया एलेनाने दिली. २०१८मध्ये कजाकस्तानने तिला टेनिससाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आणि तिने तेथून खेळण्याचा निर्णय घेतला. 


Web Title: Kazakhstan's Elena Rybakina comes back from a set down to beat Tunisian World No. 2 Ons Jabeur 3-6, 6-2, 6-2 to win her maiden Grand Slam title at Wimbledon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.