महाराष्ट्र टेनिस स्पर्धा : बेनॉइट, टॉमी पुण्यात खेळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 02:15 AM2017-12-14T02:15:54+5:302017-12-14T02:16:14+5:30
जागतिक क्रमवारीत ४१व्या स्थानावर असलेला बेनॉइट पायरे पुण्यात होणाºया टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत पात्रता फेरीचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. फ्रान्सच्या पायरेसह जागतिक क्र. १६४ क्रमांकावर असलेला स्पेनचा टॉमी रोबरेडो हासुद्धा मुख्य स्पर्धेसाठीच्या चार स्थानांकरिता झुंज देणार आहे.
पुणे : जागतिक क्रमवारीत ४१व्या स्थानावर असलेला बेनॉइट पायरे पुण्यात होणाºया टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत पात्रता फेरीचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. फ्रान्सच्या पायरेसह जागतिक क्र. १६४ क्रमांकावर असलेला स्पेनचा टॉमी रोबरेडो हासुद्धा मुख्य स्पर्धेसाठीच्या चार स्थानांकरिता झुंज देणार आहे.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेने महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने एटीपी २५० वर्ल्ड टूर सिरीजमधील ही स्पर्धा म्हाळुंगे-बालेवाडी येथे १ ते ६ जानेवारी २०१८ दरम्यान होणार आहे. एटीपी कमबॅक प्लेअर आॅफ द इयर बेनॉइट पायरेने भारतात पार पडलेल्या पाच स्पर्धा खेळल्या आहेत. तसेच, याआधी त्याने २०१७, २०१६ व २०१२ मध्ये उपांत्य फेरी गाठली होती. स्पेनचा टॉमी रोबरेडो हा तब्बल चौदा वर्षांनी भारतात येत आहे. त्याला २००४मध्ये उपांत्य फेरीत पॅराडॉर्न श्रीचफनकडून आणि २००२मध्ये रशियाच्या आंद्रे स्टोलिएरोव्हकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
पायरे याने या वर्षी माद्रिद येथील एटीपी मास्टर्स १००० स्पर्धेत दुसºया फेरीत जागतिक क्रमवारीत तिसºया स्थानावर असलेल्या स्टॅनिस्लास वावरिंकाला पराभूत करून कारकिर्दीतील सर्वोत्तम विजय मिळविला आहे. मात्र, वावरिंकाच्या साथीत पायरे याने २०१३मध्ये चेन्नई ओपन स्पर्धेत दुहेरी गटाचे विजेतेपद संपादन केले होते. पण २०१६मध्ये आॅस्टिन क्रायचेकच्या साथीत पायरेला जेतेपद राखण्यात अपयश आले.
गतवर्षी स्पेनच्या टॉमी रोबरेडोला दुखापतीमुळे या स्पर्धेला मुकावे लागल्यानंतर यंदा पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश मिळवावा लागेल. रोबरेडोने २००४मध्ये चेन्नई ओपनमध्ये राफेल नदालच्या साथीत दुहेरीत विजेतेपद पटकावले होते. २००८मध्ये मोनॅको येथील एटीपी मास्टर्स १००० स्पर्धेत दुहेरीत मार्क क्नोवलेस व महेश भूपती या जोडीचा पराभव करून रोबरेडोने विजेतेपद संपादन केले होते.
या वेळी स्पर्धा संचालक प्रशांत सुतार म्हणाले की, बेनॉइट पायरे, रोबरेडोसारख्या दर्जेदार खेळाडूंचा पात्रता फेरीत समावेश असल्यामुळे यंदाच्या स्पर्धेच्या रोमांचकतेत भर पडणार आहे. सुमित नागल व प्रजनेश गुणेश्वरन यांच्यामुळे भारताचे प्रतिनिधित्वही चांगल्या खेळाडूंच्या हाती आहे आणि या दोघांनीही नजीकच्या भूतकाळात चांगली कामगिरी केली आहे.