‘वॉकओव्हर’सह नदालने गाठली तिसरी फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 04:57 AM2019-08-31T04:57:38+5:302019-08-31T04:57:44+5:30
यूएस ओपन : १५ वर्षांच्या कोको गौफची लढत ओसाकाविरुद्ध
न्यूयॉर्क : १५ वर्षांची अमेरिकेची टेनिसपटू कोको गौफ यूएस ओपन टेनिसच्या तिसऱ्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरील नाओमी ओसाकाविरुद्ध खेळेल. पुरुष गटात राफेल नदालने वॉकओव्हरसह तिसरी फेरी गाठली. विद्यमान विम्बल्डन चॅम्पियन सिमोना हालेप सलग तिसºया वर्षी यूएस ओपनच्या पहिल्या फेरीत बाहेर पडली. तीन सेटपर्यत रंगलेल्या संघर्षात सिमोनाला ११६ व्या स्थानावरील टेलर साऊनसेंडने नमविले.
कोको गौफने हंगेरीच्या टिमिया बाबोस हिचा ६-२, ४-६, ६-४ ने पराभव केला. यासह १९९६ मध्ये अॅना कुर्निकोव्हानंतर यूएस ओपनच्या अंतिम ३२ खेळाडूंमध्ये दाखल होणारी दुसरी युवा खेळाडू ठरली.
तीन वेळेचा यूएस चॅम्पियन नदालला आॅस्ट्रेलियाचा थानासी कोकिनाकिस या दुखापतीमुळे माघार घेतल्याने चाल मिळाली. नदाल कोरियाचा नवखा खेळाडू चींग हियोनविरुद्ध खेळेल. सहावा मानांकित अलेक्झांडर ज्वेरेव्हने अमेरिकेचा फ्रान्सिस टियाफीवर पाच सेटमधील संघर्षात ६-३, ३-६, ६-२, २-६, ६-३ असा रोमांचक विजय मिळविला. (वृत्तसंस्था)
महिला गटात टाऊनसेंटने चौथ्या मानांकित हालेपचा २-६, ६-३, ७-६ असा पराभव केला. अव्वल मानांकित नाओमी ओसाकाने पोलंडच्या ५३ वी मानांकित माग्डा लिनेटवर ६-२,६-४ ने विजय मिळविला.
आंद्रिया पेतकोविचने झेक प्रजासत्तकाची सहावी मानांकित पेट्रा क्विटोवा हिचा ६-४, ६-४ असा पराभव केला.
शरण-नीस जोडी सलामीला पराभूत
भारताचा दिविज शरण आणि मोनाकोचा त्याचा जोडीदार हुगो नीस यांची जोडी यूएस ओपन पुरुष दुहेरीत पहिल्याच फेरीत पराभूत झाली. या जोडीला रॉबर्ट कारबालेस- फेडरिको डेलबोनिस यांनी ४-६,४-६ ने हरविले. ७२ मिनिटे चाललेल्या या सामन्यात शरण- नीस यांना एकही ब्रेक पॉर्इंट मिळविता आला नाही. आॅस्ट्रेलिया ओपनच्या पहिल्या फेरीत पराभूत झाल्यानंतर शरण यांच्या जोडीला वर्षभरात दुसऱ्यांदा हा धक्का बसला आहे.