Novak Djokovic, WIMBLEDON Final 2022 : नोव्हाक जोकोव्हिचचे २१वे ग्रँड स्लॅम जेतेपद, फायनलमध्ये 'बॅड बॉय' निक किर्गिओसला नमवले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 09:46 PM2022-07-10T21:46:22+5:302022-07-10T22:01:23+5:30

Novak Djokovic vs Nick Kyrgios, WIMBLEDON Final 2022 : नदालच्या माघारीमुळे सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच हाच यंदाच्या विम्बल्डन जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर होता आणि निकालही तसाच लागला.

Novak Djokovic vs Nick Kyrgios, WIMBLEDON Final 2022 : Novak Djokovic wins  21 Grand Slams and 7 Wimbledon titles, beat Nick Kyrgios by 4-6, 6-3, 6-4, 7-6 | Novak Djokovic, WIMBLEDON Final 2022 : नोव्हाक जोकोव्हिचचे २१वे ग्रँड स्लॅम जेतेपद, फायनलमध्ये 'बॅड बॉय' निक किर्गिओसला नमवले

Novak Djokovic, WIMBLEDON Final 2022 : नोव्हाक जोकोव्हिचचे २१वे ग्रँड स्लॅम जेतेपद, फायनलमध्ये 'बॅड बॉय' निक किर्गिओसला नमवले

Next

Novak Djokovic vs Nick Kyrgios, WIMBLEDON Final 2022 : राफेल नदालने दुखापतीमुळे उपांत्य फेरीच्या सामन्यातून माघार घेतली अन् ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसची लॉटरी लागली. नदालच्या माघारीमुळे सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच हाच यंदाच्या विम्बल्डन जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर होता आणि निकालही तसाच लागला. नोव्हाकने सातव्यांदा विम्बल्डन जेतेपद पटकावले. त्याने यापूर्वी २०११, २०१४,  २०१५, २०१८, २०१९ व २०२१ मध्ये येथे जेतेपदाचा चषक उंचावला होता. हे त्याचे २१वे ग्रँड स्लॅम जेतेपद ठरले आणि त्याने रॉजर फेडररला ( २०) मागे टाकले. राफेल नदाल सर्वाधिक २२ ग्रँड स्लॅमसह आघाडीवर आहे.  


निकने पहिला सेट २९ मिनिटांत ६-४ असा नावावर करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. पण, दुसऱ्या सेटमध्ये नोव्हाकने जबरदस्त कमबॅक करताना सलग सहा गुणांची कमाई केली. मागील तीन सामन्यांत नोव्हाकने प्रथमच निकची सर्व्हिस ब्रेक केली. नोव्हाकने दुसरा सेट ६-३ असा जिंकून सामना १-१ असा बरोबरीत आणला.  नोव्हाकने या सेटमध्ये चार ब्रेक पॉईंट वाचवले.  

तिसऱ्या सेटमध्ये निककडून चुका झाल्या आणि नैराश्येत तो प्रेक्षकांमधील एका व्यक्तिशी हुज्जत घालताना दिसला. निकची ही जुनीच सवय होती.  त्याने प्रेक्षकांमधील दारूड्या व्यक्तिला बाहेर पाठवण्याची मागणी चेअर पंचाकडे केली. पण, त्याचा फार काही उपयोग झाला नाही नोव्हाकने  तिसरा सेट ६-४ असा घेत २-१ अशी आघाडी घेतली. २-१ अशी आघाडी घेतल्यानंतर नोव्हाक विम्बल्डनमध्ये एकदाच पराभूत झाला आहे आणि तोही २००६मध्ये मारियो एन्सिककडून. २९ मॅच त्याने जिंकल्या आहेत.  

चौथ्या सेटमध्ये कमालीचा थरार पाहायला मिळाला. निकने १-२ अशा पिछाडीवरून त्या सेटमध्ये ५-५ अशी बरोबरी मिळवली. निकने ६-५ अशा आघाडीसह स्वतःची बाजू थोडी वरचढ केली. नोव्हाकने ६-६ अशी बरोबरी मिळवताना टाय ब्रेकमध्ये हा सेट नेला. निकने या टाय ब्रेकरमध्ये दोन मॅच पॉईंट वाचवले. नोव्हाकने पण मॅच पॉईंट घेतला अन् ४-६, ६-३, ६-४, ७-६ अशा फरकाने जेतेपद नावावर केले.

Web Title: Novak Djokovic vs Nick Kyrgios, WIMBLEDON Final 2022 : Novak Djokovic wins  21 Grand Slams and 7 Wimbledon titles, beat Nick Kyrgios by 4-6, 6-3, 6-4, 7-6

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.