French Open - नोव्हाक जोकोव्हिचने फ्रेंच ओपन जिंकली, सर्वाधिक ग्रँड स्लॅम नावावर केली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2023 09:59 PM2023-06-11T21:59:28+5:302023-06-11T22:00:11+5:30
नोव्हाक जोकोव्हिचने रविवारी इतिहास घडविला. फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने पुरूष एकेरीत नॉर्वेच्या कॅस्पर रूडचा पराभव केला
नोव्हाक जोकोव्हिचने रविवारी इतिहास घडविला. फ्रेंच ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने पुरूष एकेरीत नॉर्वेच्या कॅस्पर रूडचा पराभव केला अन् ग्रँड स्लॅम स्पर्धा इतिहासात सर्वाधिक २३ जेतेपदं जिंकणारा पुरुष टेनिसपटू तो ठरला. त्याने स्पेनच्या राफेल नदालचा २२ ग्रँड स्लॅम जेतेपदाचा विक्रम मोडला. नदालने दुखापतीमुळे यंदाच्या फ्रेंच ओपन स्पर्धेतून माघार घेतली होती. जोकोव्हिचने ७-६ ( ७-१), ६-३, ७-५ असा सरळ सेटमध्ये विजय मिळवताना फ्रेंच ओपन नावावर केली.
A Parisian trio 🏆🏆🏆#RolandGarros | @DjokerNolepic.twitter.com/GNG2f7Gujz
— Roland-Garros (@rolandgarros) June 11, 2023
पहिल्या सेटमध्ये २४ वर्षीय कॅस्परकडून चांगला खेळ पाहायला मिळाला. यापूर्वी २०२१ची विम्बल्डन उपांत्यपूर्व फेरी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. पण, फ्रेंच ओपन स्पर्धेत त्याने अंतिम फेरीत प्रवेश मिळवताना सर्वांना धक्का दिला. पण, अनुभवी जोकोव्हिचसमोर त्याचा निभाव लागला नाही. टाय ब्रेकरमध्ये पहिला सेट गमावण्यासोबतच कॅस्परचा आत्मविश्वासही गेला. त्यानंतर जोकोव्हिचने दुसरा सेट ६-३ असा सहज घेतला. तिसऱ्या सेटमध्ये नॉर्वेच्या खेळाडूकडून टक्कर मिळाली, परंतु सर्बियन जोकोव्हिच भारी पडला.
नोव्हाक जोकोव्हिचचे ग्रँड स्लॅम जेतेपदं
ऑस्ट्रेलियन ओपन - २००८, २०११, २०१२, २०१३, २०१५, २०१६, २०१९, २०२०, २०२१, २०२३
फ्रेंच ओपन - २०१६, २०२१, २०२३
विम्बल्डन - २०११, २०१४, २०१५, २०१८, २०१९, २०२१, २०२२
अमेरिकन ओपन - २०११, २०१५, २०१८
🇷🇸 HISTORY 🇷🇸#RolandGarrospic.twitter.com/5d4r8keSE6
— Roland-Garros (@rolandgarros) June 11, 2023