स्टार खेळाडूच्या पत्नीनं कोरोनाबाबत चुकीची माहिती केली पोस्ट, अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 10:09 AM2020-04-22T10:09:13+5:302020-04-22T10:10:04+5:30
जगभरातील कोरोना रुग्णाची संख्या 25 लाख, 57,504 झाली आहे.
जगभरातील कोरोना रुग्णाची संख्या 25 लाख, 57,504 झाली आहे. त्यापैकी 1 लाख 77,662 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 6 लाख 90,681 जणं बरी झाली आहेत. कोरोना व्हायरसची धास्ती सर्वांनीच घेतली आहे. त्यात कोरोना संदर्भात येणारी कोणतीही माहिती खात्री न करताच फॉरवर्ड केली जात आहे. त्यामुळे ही भीती अजूनच वाढत चालली आहे. विविध देशांनी अशा चुकीच्या माहिती पसरवण्यांवर कठोर कारवाईसाठीचा कायदा केला आहे. पण, तरीही अशा माहिती पसरत आहेच. सामान्य सोडा आता स्टार खेळाडूच्या पत्नीनंच कोरोना व्हायरससंदर्भात चुकीची माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली.
सर्बियन टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिचची पत्नी जेलेनानं कोरोना संदर्भात चुकीची माहिती देणारा एक व्हिडीओ तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केला. 33 वर्षीय जेलेनानं शेअर केलेल्या 10 मिनिटांच्या व्हिडीओत कोरोना व्हायरसचा संदर्भ 5G शी जोडला गेला आहे. तिची ही पोस्ट बॉक्सर आमीर खान, लीन रायन, जेसन गार्डिनर आणि कॅलम बेस्ट आदी सेलिब्रेटिंनीही शेअर केली. जेलेनाचे इंस्टाग्रामवर 5 लाख फॉलोअर्स आहेत.
तिनं हा व्हिडीओ शेअर करताना पोस्ट लिहिली की,''कोरोना व्हायरस संदर्भात तुमचं मत काय? कोरोना व्हायरसला कारणीभूत असल्याचा दावा करणारे अनेक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. त्याची खात्री करण्यास कोणाकडे वेळ नाही, तुम्ही हा व्हिडीओ तपासा आणि मला तुमचं मत कळवा.''
Independent Fact Checkers ने त्वरीत हा व्हिडीओ डिलिट केला. आफ्रिकेला कोरोना व्हायरसचा फटका बसला नाही, कारण तेथे 5G नाही, असा दावा काही दिवसांपूर्वी केला गेला होता.