आशियाई विजेत्यास थेट आॅलिम्पिक प्रवेश; जकार्ता येथे होणारी स्पर्धा सुवर्णसंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 01:27 AM2018-02-15T01:27:46+5:302018-02-15T01:27:55+5:30

जकार्ता येथे होणा-या आशियाई स्पर्धेद्वारे पुरुष आणि महिला एकेरीतील टेनिस खेळाडूंना २0२0 टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची संधी मिळणार आहे.

Olympic entrance to the Asian championship; Gold medal in Jakarta | आशियाई विजेत्यास थेट आॅलिम्पिक प्रवेश; जकार्ता येथे होणारी स्पर्धा सुवर्णसंधी

आशियाई विजेत्यास थेट आॅलिम्पिक प्रवेश; जकार्ता येथे होणारी स्पर्धा सुवर्णसंधी

Next

नवी दिल्ली : जकार्ता येथे होणा-या आशियाई स्पर्धेद्वारे पुरुष आणि महिला एकेरीतील टेनिस खेळाडूंना २0२0 टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची संधी मिळणार आहे.
आयटीएफने आज टेनिससाठी टोकियो २0२0 क्वॉलिफिकेशन प्रणालीनुसार सहा खंडांत क्वॉलिफिकेशन स्पर्धा सुरू करण्याची घोषणा केली आहे. ज्याला आयओसी कार्यकारी मंडळाची मान्यता मिळाली आहे.
२0२0 मध्ये आॅलिम्पिकच्या टेनिस स्पर्धेत पाच पुरुष एकेरी, दुहेरी आणि महिला एकेरी, दुहेरी तसेच संमिश्र दुहेरी आदी स्पर्धा होतील. प्रत्येक एकेरी ड्रॉमध्ये ६४ खेळाडू असतील. त्यात एका देशातील जास्तीत जास्त चार खेळाडू सहभागी होऊ शकतात. आधीप्रमाणेच ५६ जणांना यात थेट प्रवेश मिळणार आहे, तर त्यात आठ आयटीएफ स्थान असतील. त्यात सहा खंडातील क्वॉलिफिकेशन स्थानांचा समावेश असेल. तथापि, ८ जून २0२0 पर्यंत खेळाडूंचे एकेरीचे रँकिंग ३00 च्या आत असावे लागणार आहे.
आयटीएफचे अध्यक्ष डेव्हिड हॅगर्टी म्हणाले की, ‘खंडीय क्वॉलिफिकेशन स्थान सुरू होणे खूप महत्त्वाचा व सकारात्मक बदल आहे. त्यामुळे विभागीय खेळांत सहभाग निश्चित होण्यास मदत मिळेल आणि त्यामुळे आॅलिम्पिक टेनिस स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अतिरिक्त देशांनादेखील संधी मिळेल.’ उत्तर आणि दक्षिण अमेरिकी खंडातील क्वॉलिफिकेनशचा मार्ग पेरूच्या लिमा येथे २0१९ पॅन अमिरेकी स्पर्धेने मिळेल. यातील अंतिम फेरीतील खेळाडू आॅलिम्पिकसाठी पात्र ठरतील.

Web Title: Olympic entrance to the Asian championship; Gold medal in Jakarta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा