सानिया मिर्झाने उडवली पाकिस्तानच्या 'या' क्रिकेटपटूची खिल्ली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 01:08 PM2018-09-17T13:08:12+5:302018-09-17T13:09:17+5:30
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक या दाम्पत्यला एकमेकांचा विरह सहन होत नाही. गर्भवती असल्याने सानियाला अशा काळात पती शोएबने आपल्यासोबत रहावे असे वारंवार वाटत आहे आणि तसे मॅसेज ती सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.
मुंबई : भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिक या दाम्पत्यला एकमेकांचा विरह सहन होत नाही. गर्भवती असल्याने सानियाला अशा काळात पती शोएबने आपल्यासोबत रहावे असे वारंवार वाटत आहे आणि तसे मॅसेज ती सोशल मीडियावर पोस्ट करत आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघासोबत दुबईत असलेला शोएबही सोशल मीडियावर आपले प्रेम व्यक्त करत आहे. या दोन्ही 'लव्ह बर्ड'ची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यांच्या या प्रेम व्यक्त करण्याच्या स्टाईलची पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूने कॉपी केली आणि सानिया मिर्झाने त्याची खिल्ली उडवली.
दोन दिवसांपूर्वी सानियाला सप्राईज देणारा एक व्हिडिओ शोएबने पोस्ट केला होता. 19 सेकंदाच्या या व्हिडिओत शोएबने सानियाला सप्राईझ लुकची भेट दिली होती आणि त्यावर सानियाही भलतीच खूश झाली होती. तिने त्वरित ते ट्विट रिट्विट करून शोएबला प्रेमाचा संदेश पाठवला होता.
Awww. Well ‘we’ can't wait for you to come back home ❤️ This has surely turned the clock back for you hubby. @realshoaibmalik #timemachine#breakthebeard#lovethenewlook#beautifulface indeed. 😘 pic.twitter.com/ThQTaZ4tJl
— Sania Mirza (@MirzaSania) September 15, 2018
सानिया व शोएबच्या या प्रेम व्यक्त करण्याच्या स्टाईलमधून प्रेरणा घेत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू अझर महमूद यानेही आपल्या पत्नी इबाकला इम्प्रेस करण्यासाठी एक व्हिडिओ पोस्ट केला. शोएबप्रमाणे अझरने पत्नी इबाकसाठी नवा सप्राईज लुकची भेट दिली. 'सगळे आपापल्या पत्नीला खूश करण्यासाठी सप्राईज देत आहेत, तर मी माझ्या पत्नीसाठीही काही करतो,'असा मॅसेज लिहून अझरने एक व्हिडिओ पोस्ट केला. पण त्याचा हा प्रयत्न फसला आणि सानिया मिर्झाने त्याची चांगलीच खिल्ली उडवली.
Jub sub kararay hai toh hum bhi khush karday begum ko @EbbaQ#AsiaCup18#AbkhelJamega#BreakTheRule 😂 pic.twitter.com/GsiCgaYufS
— Azhar Mahmood (@AzharMahmood11) September 16, 2018
अझरची ती पोस्ट रिट्विट करून सानियाने असे धाडस केले नसते असा सल्ला दिला. ती म्हणाली,'' जर मी तुमच्या जागी असते आणि इबाक माझी पत्नी असती, तर असे धाडस मी केले नसते. तुम्हाला घरी जायचे आहे, हे लक्षात ठेवा.'' अर्थात हा सर्व मस्करीचा भाग होता, परंतु नेटिझन्सचे चांगलेच मनोरंजन होत आहे.
Ajju bhai if I was you and @EbbaQ was my wife I would not have the guts to do this 😂😂 #fullmarksforguts lekin ghar bhi toh jaana hai eventually yaad rakhein 😂 me and her are friends for a reason after all 😉😜 https://t.co/6mRlJT3CoR
— Sania Mirza (@MirzaSania) September 17, 2018