नदाल अव्वलस्थानी कायम; अमेरिकन ओपन जिंकाणाऱ्या जोकोव्हिचची मुसंडी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2018 08:34 AM2018-09-11T08:34:27+5:302018-09-11T08:35:07+5:30
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दुखापतीमुळे माघार घेणाऱ्या राफेल नदालने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे.
माद्रिद : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दुखापतीमुळे माघार घेणाऱ्या राफेल नदालने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. टेनिस असोसिएशनने जाहीर केलेल्या क्रमवारीत स्पेनचा नदाल ८७६० गुणांसह आघाडीवर आहे. स्वित्झर्लंडचा रॉजर फेडररही दुसऱ्या स्थानावर कायम आहे. मात्र अमेरिकन ओपन स्पर्धेत जेतेपद पटकावणारा नोव्हाक जोकोव्हिच जोरदार मुसंडी मारताना तीन स्थान वर सरकला आहे.
This week’s ATP Top 10 post #USOpen
— Live Tennis (@livetennis) September 10, 2018
1️⃣ Nadal
2️⃣ Federer
3️⃣ Djokovic (+3)
4️⃣ Del Potro (-1)
5️⃣ Zverev (-1)
6️⃣ Cilic (+1)
7️⃣ Dimitrov (+1)
8️⃣ Thiem (+1)
9️⃣ Anderson
1️⃣0️⃣ Isner (+1) pic.twitter.com/JMeA7AfL82
सर्बियाच्या जोकोव्हिचने अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत आर्जेंटिनाच्या जुआन मार्टिन डेल पोत्रोचा ६-३, ७-६(७/४), ६-३ असा पराभव करून १४ वे ग्रँड स्लॅम जेतेपद नावावर केले. अमेरिकन ओपन स्पर्धेच्या या तिसऱ्या जेतेपदाबरोबर त्याने पीट सॅम्प्रास यांच्या १४ ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली. तो आता जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आला आहे.
.@DjokerNole moved from No. 6 to No. 3 in the #ATP Rankings following his 3rd @usopen title. #Djokovic is back in the Top 3 for 1st time since June 11, 2017. Also 1st time since April 5, 2015 #Nadal, #Federer, Djokovic all in Top 3.
— ATP Media Info (@ATPMediaInfo) September 10, 2018
जर्मनीच्या ॲलेक्सझांडर झेरेव्ह पाचव्या, तर क्रोएशियाचा मारिन सिलिच आणि बल्गेरियाचा ग्रिगोर दिमित्रोव्ह अनुक्रमे सहाव्या व सातव्या स्थानावर आहेत.