काटकसरी नदाल, केला इकोनॉमी क्लासमधून प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 10:18 AM2018-07-20T10:18:41+5:302018-07-20T10:19:48+5:30
स्पेनच्या राफेल नदालला विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचकडून पाच सेटमध्ये रंगलेल्या थरारक लढतीत पराभव पत्करावा लागला. त्या पराभवाच्या चर्चेनंतर नदाल पुन्हा सोशल मीडियावर ट्रेंडिंग टॉपीक ठरत आहे.
लंडन - स्पेनच्या राफेल नदालला विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचकडून पाच सेटमध्ये रंगलेल्या थरारक लढतीत पराभव पत्करावा लागला. विम्बल्डन स्पर्धेच्या इतिहासातील ही एक रोमांचक लढत ठरली. त्या पराभवाच्या चर्चेनंतर नदाल पुन्हा सोशल मीडियावर ट्रेंडिंग टॉपीक ठरत आहे. यावेळी त्याच्या विनयशीलतेमुळे तो चर्चेत आहे.
टेनिसचा हा स्टार खेळाडूने विमानातून चक्क इकोनॉमी क्लासमधून प्रवास केल्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्याने बार्सिलोना ते मॅनकोर हा प्रवास सामान्य प्रवाशांसोबत केला. एअर युरोपाच्या विमानात एक्सिट दरवाजा शेजारील सीटवर बसून नदाल पेपर वाचत असल्याचे छायाचित्रात दिसत आहे. चाहत्यांनी त्यांनतर नदालची भरभरून प्रशंसा केली.
Imagine how excited you are to get a Centre Court semis ticket to #RafaelNadal and #Djokovic 🎾Then this happens. #Wimbledon#isitoveryet#5thsettiebreaker
— Kathy Nugent (@LadyNuge) July 13, 2018
विम्बल्डनच्या उपांत्या फेरीत जोकोव्हिचने 6-4, 3-6, 7-6, 3-6, 10-8 अशा फरकाने नदालला पराभूत केले. नदाल हा जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे असे मत जोकोव्हिचनेही व्यक्त केले होते. नदालविरूद्धच्या जयपराजयाच्या आकडेवारीत जोकोव्हिच 27-25 असा आघाडीवर आहे. फोर्ब्सने नुकत्याच जाहीर केलेल्या श्रीमंत सेलेब्रिटींमध्ये किंग ऑफ क्ले नदाल 72 व्या स्थानावर आहे. त्याचे एकूण उत्पन्न 41.4 कोटी अमेरिकन डॉलर इतके आहे.