राफेल नदाल, झ्वेरेव, थीएम व हालेप यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 05:02 AM2020-01-28T05:02:58+5:302020-01-28T05:05:06+5:30
स्पेनच्या अव्वल मानांकित खेळाडूला स्थानिक दावेदार निक किर्गियोसने कडवी लढत दिली. प
मेलबोर्न : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला राफेल नदाल, जर्मनीचा अलेक्झँडर झ्वेरव, आॅस्ट्रियाचा पाचवा मानांकित डॉमिनिक थीएम यांनी आॅस्टेÑलियन ओपन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. महिलांमध्ये दोनवेळची ग्रँडस्लॅम चॅम्पियन सिमोना हालेपने विजयी कूच कायम ठेवली.
स्पेनच्या अव्वल मानांकित खेळाडूला स्थानिक दावेदार निक किर्गियोसने कडवी लढत दिली. पण नदालने रॉड लेवर परिसरात ६-३, ३-६, ७-६, ७-६ अशी बाजी मारली. नदालला अंतिम आठमध्ये डॉमिनिक थीएमविरुद्ध खेळेल. थीएमने फ्रान्सच्या गेल मोनफिल्सचा ६-२, ६-४, ६-४ असा पराभव केला.
सातव्या मानांकित झ्वेरवने फॉर्मात असलेल्या रशियाच्या आंद्रेय रुब्लेवचा धुव्वा उडवताना एक तास ३७ मिनिटांत ६-४, ६-४, ६-४ असा विजय मिळवला. झ्वेरेवची या खेळाडूविरुद्ध १५ सामन्यांतील १५ वा विजय होता. उपांत्य फेरी गाठण्यासाठी झ्वेरेवला स्वित्झर्लंडच्या स्टॅन वावरिंकाच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. वावरिंकाने दानिल मेदवेदेवचा पराभव करत आगेकूच केली. १५ व्या मानांकित वावरिंकाने चौथ्या मानांकित खेळाडूला ६-२, २-६, ४-६, ७-६, ६-२ असे नमवत करीत स्पर्धेतून गाशा गुंडाळण्यास भाग पाडले. (वृत्तसंस्था)
1महिला विभागात चौथ्या मानांकित रोमानियाच्या हालेपने बेल्जियमच्या १६ व्या मानांकित एलिस मार्टेन्सचा ६-४, ६-४ असा पराभव करीत अंतिम आठमधील स्थान निश्चित केले.
2जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू व २०१८ च्या अंतिम फेरीमध्ये कारोलिन व्होज्नियाकीविरुद्ध पराभूत होणाऱ्या हालेपने मेलबोर्नमध्ये यंदा आतापर्यंत एकही सेट गमावलेला नाही. या विजयासह ती जागतिक क्रमवारीत तिसºया स्थानावरुन दुसºया स्थानावर पोहोचेल.