''रॉजर फेडररचा विश्वविक्रम गाठण्याचा विचार नाही''
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 03:50 AM2020-01-09T03:50:28+5:302020-01-09T07:09:25+5:30
‘आगामी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळताना फेडररचा सर्वाधिक ग्रॅँडस्लॅम विजेतेपदाच्या विश्वविक्रमाची बरोबरी करण्याचा कोणताही विचार करत नाही,’
पर्थ : ‘आगामी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत खेळताना फेडररचा सर्वाधिक ग्रॅँडस्लॅम विजेतेपदाच्या विश्वविक्रमाची बरोबरी करण्याचा कोणताही विचार करत नाही,’ असे जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या स्पेनच्या दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल याने स्पष्ट केले.
स्वित्झर्लंडचा दिग्गज रॉजर फेडररच्या सर्वाधिक २० ग्रॅँडस्लॅम जिंकण्याच्या विश्वविक्रमाची बरोबरी करण्यासाठी नदालला फक्त एका जेतेपदाची गरज आहे. याबाबत राफा म्हणाला, ‘केवळ चांगल्याप्रकारे टेनिस खेळणे हेच सध्या माझे लक्ष्य आहे. मी या खेळाचा आंनद घेतोय. ज्या स्पर्धांमध्ये मी सहभागी होतो त्यामध्ये चांगली कामगिरी करणयाचा माझा निर्धार असतो.’ मात्र असे असले, तरी नदाल या कामगिरीला फारसे महत्त्व देत नाही.
याविषयी राफेल नदाल म्हणाला की, ‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास मी सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांच्या विश्वविक्रमाचा कोणताही विचार करत नाही. मी केवळ खेळाचा आणि स्पर्धेचा आनंद घेऊ इच्छितो. कारण असे झाल्यास मी चांगले प्रदर्शन करण्यात यशस्वी ठरतो.’
>नदालकडे नव्या विश्वविक्रमाची संधी
सर्वाधिक ग्रँडस्मॅम विजेत्यांच्या यादीत फेडरर २००९ सालापासून अव्वल स्थानी विराजमान आहे. त्यावेळी, त्याने दिग्गज पीट सँप्रासच्या १४ ग्रँडस्लॅम विजेतेपदांचा विश्वविक्रम मोडला होता. विशेष म्हणजे जर, आॅस्टेÑलिया ओपन जिंकण्यात नदाल यशस्वी ठरला, तर यानंतर होणाºया आपल्या आवडत्या फ्रेंच ओपनमध्ये बाजी मारुन नदाल नवा विश्वविक्रम रचू शकतो. सध्या सुरु असलेल्या एटीपी कप टेनिस स्पर्धेत बुधवारी नदालला एटीपी स्टीफन एडबर्ग खिलाडूवृत्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.