ग्रेट; Roger Federer नं वचन पूर्ण केलं, टेरेसवर टेनिस खेळणाऱ्या मुलींना राफेल नदालच्या अकादमीत दाखल केलं
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 11:23 PM2021-10-19T23:23:00+5:302021-10-19T23:37:41+5:30
मागच्या वर्षी कोरोनाच्या काळात समोरासमोरील इमारतीच्या छतांवरून टेनिस खेळणाऱ्या दोन मुलींचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता.
मागच्या वर्षी कोरोनाच्या काळात समोरासमोरील इमारतीच्या छतांवरून टेनिस खेळणाऱ्या दोन मुलींचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. ATPनं टेरेसवर टेनिस खेळणाऱ्या या मुलींचा व्हिडीओ पोस्ट केला होता आणि त्या रातोरात फेमसही झाल्या. 13 वर्षीय व्हिटोरीया आणि 11 वर्षीय कॅरोला यांचा तो व्हिडीओ पाहून दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर यांनी त्यांना सप्राईज दिलं होतं. फेडरर त्या मुलींना न सांगता त्यांना भेटण्यासाठी दाखल झाला. त्यावेळी त्यानं या मुलींना राफेल नदालच्या अकादमीत प्रेवश मिळावा यासाठी शब्द टाकणार असल्याचे वचन दिले होते आणि ते त्यानं पूर्ण केलं.
फेडरर स्वतः या मुलींना भेटण्यासाठी इटलीत दाखल झाला होता. १० जुलै २०२० ला फेडररनं या मुलींच्या घरी सप्राईज भेट दिली. 38 वर्षीय फेडररनं या मुलींचं कौतुक केलं होतं. तो म्हणाला,''एक टेनिसपटू म्हणून माझ्या कारकिर्दितील हा खास क्षण आहे. चाहत्यांना किंवा मुलांना सप्राईज देणं मला आवडतं. आणि कॅरोला व व्हिटोरीया यांना भेटून मलाही आनंद झाला.'' फेडरर या मुलींसह टेरेस टेनिसही खेळला होता.
फेडरर आणि त्याचे प्रायोजक Barilla यांनी या मुलींना राफेल नदाल अकादमीत प्रवेश मिळवून दिला आणि या मुलींनी राफेलसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला.
https://t.co/4NmyCBPzSUpic.twitter.com/hb3ufR5ZRp
— Tanika (@SitTanyusha) October 10, 2021
Mazie Grille😎🍝 @rnadalacademy@Barillahttps://t.co/9QFsHA6EYF
— Roger Federer (@rogerfederer) October 11, 2021