200 आठवडे नंबर वन, टू, थ्री; हा विक्रम करणारा रॉजर फेडरर एकटाच! 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 12:00 PM2019-10-02T12:00:29+5:302019-10-02T12:01:07+5:30

रॉजर फेडरर हा आता एवढ्या वर्षांपासून टेनिस खेळतोय की दर आठवड्याला त्याच्या नावावर नवनवे विक्रम लागत आहेत.

Roger Federer record; stay 200 Weeks in Number One, Two, Three ! | 200 आठवडे नंबर वन, टू, थ्री; हा विक्रम करणारा रॉजर फेडरर एकटाच! 

200 आठवडे नंबर वन, टू, थ्री; हा विक्रम करणारा रॉजर फेडरर एकटाच! 

Next

- ललित झांबरे 
रॉजर फेडरर हा आता एवढ्या वर्षांपासून टेनिस खेळतोय की दर आठवड्याला त्याच्या नावावर नवनवे विक्रम लागत आहेत. आता तर त्याच्या नावावर असा विक्रम लागलाय की टेनिसच्या इतिहासात क्वचितच कुणाला असा विक्रम करता येईल.  टेनिसच्या जागतिक क्रमवारीत नंबर एक, दोन आणि तीन अशा पहिल्या तीन क्रमांकावर प्रत्येकी किमान 200 आठवडे राहिलेला तो एकमेव टेनिसपटू ठरला आहे. 

गंमत म्हणजे याच फेडररला क्रमवारीत टॉप- टेनमध्ये पोहोचायला त्याला वेळ लागला होता. 2002 मध्ये तो पहिल्यांदा क्रमवारीत टॉप टेनमध्ये पोहोचला होता.तेंव्हापासून गेली दोन दशके तो टॉप टेनमध्ये कायम आहे. 

2003 मध्ये तो पहिल्यांदा विम्बल्डन विजेता बनला त्यावेळी म्हणजे जुलै 2003 मध्ये तो टॉप तीनमध्ये पोहोचला होता. 2004 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदाने त्याला पहिल्यांदा सर्वोच्च स्थानी पोहचवले होते. तेंव्हापासून पुढची सलग साडेचार वर्ष (सलग 237 आठवडे) फेडररने अव्वल स्थान स्वतःकडेच कायम राखले होते. तेंव्हापासून 2011 मधील एक-दोन आठवड्यांचा अपवाद वगळता फेडरर 2003 ते 2013 दरम्यान सातत्याने पहिल्या तीनमध्ये कायम राहिला. 2014च्या विम्बल्डन अंतिम फेरीने त्याचे स्थान भक्कम केले. त्याकाळात नदाल, जोकोवीच, मरे यांच्या

स्पर्धेतही फेडररने आपले स्थान ढळू दिले नाही आणि जिमी कॉनर्सचा 590 आठवड्यांचा विक्रम त्याने मागे टाकला. 
2016 मध्ये गुडघ्याच्या दुखण्याने फेडररला विश्रांती घेण्यास भाग पाडले. पण पुढल्या वर्षी विम्बल्डन जिंकून तो पुन्हा टॉप- 3 मध्ये पोहोचला. 2018 मध्ये तर वयाच्या 37 व्या वर्षी तो नंबर वन बनला. आता ऑक्टोबर 2018 पासून तो टॉप- 3 मध्ये कायम असून 730 आठवडे टॉप 3  मध्ये त्याने पूर्ण केले आहे. यात जिमी कॉनर्स व राफेल नदालला त्याने मागे टाकले. आता फेडरर क्रमवारीत सर्वोच्च स्थानी 310 आठवडे, दुसऱ्या स्थानी 218 आठवडे आणि तिसऱ्या स्थानी 201 आठवडे आहे. याप्रकारे नंबर 1, 2 आणि 3 अशा तीन स्थानी प्रत्येकी किमान दोनशे आठावडे राहणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

Web Title: Roger Federer record; stay 200 Weeks in Number One, Two, Three !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.