रॉजर फेडरर जागा होss; ग्रेटाच्या टीकेनंतर 'टेनिस सम्राट' नेटिझन्सच्या निशाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 05:09 PM2020-01-10T17:09:10+5:302020-01-10T17:09:48+5:30

ऑस्ट्रेलियाला लागलेल्या भीषण आगीतील पुनर्वसनासाठीच्या प्रदर्शनीय सामन्यात फेडरर खेळणार, पण...

'Roger Wake Up Now', Greta Thunberg criticizes Roger Federer for his role as Ambassador of Credit Suisse | रॉजर फेडरर जागा होss; ग्रेटाच्या टीकेनंतर 'टेनिस सम्राट' नेटिझन्सच्या निशाण्यावर

रॉजर फेडरर जागा होss; ग्रेटाच्या टीकेनंतर 'टेनिस सम्राट' नेटिझन्सच्या निशाण्यावर

Next

पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने स्वीडनमधून पृथ्वीची विनाशाकडे होत असलेली वाटचाल रोखण्यासाठी काही तरी करा, अशी साद घातली होती. त्यानंतर सोशल मीडियावर तिचीच चर्चा रंगली. तरुण वर्गानं तिला डोक्यावर घेतलं. याच ग्रेटा थनबर्गनं आता तिचा मोर्चा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला टार्गेट केले आहे. 2017पासून थनबर्ग पर्यावरण रक्षणासाठी लढा देत आहे. तिनं तिचा मोर्चा फेडररकडे वळवला आहे. रॉजर फेडरर Credit Suisse या स्वित्झर्लंडमधील बँकेचा सदिच्छादूत आहे. ही बँक जीवाश्म इंधन तयार करणाऱ्या कंपनींना पैसा पुरवते. त्यामुळे थनबर्गनं फेडररवर टीका केली आहे.


नोव्हेंबर 2018 पासून Credit Suisse या बँकेविरुद्ध आंदोलनं सुरु आहेत. पर्यावरणासाठी काम करणाऱ्या 12 कार्यकर्त्यांनी तेव्हा बँकेच्या ल्युसाने येथील शाखेत आंदोलन केले होते.  आता Credit Suisse या वादात 20 ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकणाऱ्या फेडररला खेचण्यात आले आहे. त्यामुळे ट्विटरवर #RogerWakeUpNow हा हॅशटॅग सध्या ट्रेंड होत आहे. काही कार्यकर्ते फेडररचा सामना सुरु असलेल्या स्टेडियममध्येही जाऊन निषेध नोंदवत आहेत. हातात बॅनर घेऊन ते फेडीला प्रश्न विचारत आहेत की, Credit Suisse जगाचा नाश करत आहे. रॉजर तू त्यांना पाठिंबा देत आहेस ?
 

Web Title: 'Roger Wake Up Now', Greta Thunberg criticizes Roger Federer for his role as Ambassador of Credit Suisse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.