लिएंडर पेस दुबई ड्यूटी फ्री टेनिस चॅम्पियनशिपमध्ये उपविजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 01:55 AM2018-03-04T01:55:48+5:302018-03-04T01:55:48+5:30

Runner-up in Leander Paes Dubai Duty Free Tennis Championships | लिएंडर पेस दुबई ड्यूटी फ्री टेनिस चॅम्पियनशिपमध्ये उपविजेता

लिएंडर पेस दुबई ड्यूटी फ्री टेनिस चॅम्पियनशिपमध्ये उपविजेता

Next

दुबई : भारताचा अनुभवी टेनिस खेळाडू लिएंडर पेसला जेमी सेरेटानीसोबत दुबई ड्डु्युटी फ्री टेनिस चॅम्पियशिपमध्ये उपविजेता ठरला. मात्र येथे मिळालेल्या गुणांमुळे डेविस कप निवडीपूर्वी त्याच्या रँकिंगमध्ये मोठा फरक पडुू शकतो.
आपल्या ९७ व्या एटीपी टूर फायनलमध्ये खेळणाºया पेस आणि त्याचा अमेरिकन साथीदार जेमी सेरेटानी ला पुरुष दुहेरी स्पर्धेत १ तास २७ मिनिटे चाललेल्या लढतीत नेदरलॅण्डच्या जीन ज्युलियन रोजर आणि रोमानियाच्या होरिया टेकाऊकडून २-६,६-७ असा पराभव पत्करावा लागला. रॉजर आणि टेकाऊ जोडीचे हे १७ वे एटीपी टूर विजेतेपद आहे. तर पेस टूरवर अंतिम सामन्यांच्या शतकापासून तीन फायनल्स लांब आहे. त्याचे हे प्रो सर्किटवरील २८ वे सत्र आहे.
पेस तीन वर्षांनंतर आपली पहिली एटीपी टूर फायनल खेळला. या खेळामुळे त्याला ३०० रँकिंग गुण मिळाले. पेस सध्या विश्व रँकिंगमध्ये ५२ व्या स्थानावर आहे आणि त्याचे १५२५ गुण आहेत.
रोहन बोपन्ना विश्व रँकिंगमध्ये २० व्या स्थानावर आहे. द्विज शरण हा ४५ व्या स्थानावर आहे. त्याचे १७१५ गुण आहे.
या स्पर्धेत त्याला यूएईच्या सुगिता हिच्या साथीने लढताना पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. पेस २०१७ मध्ये सर्वात चांगला खेळ करत आहे. मात्र तो द्विज शरण च्यापुढे जाऊ शकतो की नाही हे पाहणे रंजक ठरेल.
डे विस कप संघाच्या निवडीसाठी निवड समिती रँकिंगवरदेखील लक्ष देते. गेल्या वर्षी बंगळुरू प्रकरणानंतर पेसकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यावेळी कर्णधार महेश भुपती याने त्याला सहा सदस्यीय संघात घेतले होते. मात्र अंतिम चारमध्ये संधी दिली नव्हती.
भारताला एप्रिलमध्ये एशिया ओसियाना ग्रुप एमध्ये दुसºया फेरीत चीनसोबत लढायचे आहे.

Web Title: Runner-up in Leander Paes Dubai Duty Free Tennis Championships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा