साकेत मायनेनीची विजयी सलामी; शशी कुमार मुकुंद, जेसन जूंग पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 01:48 AM2018-12-30T01:48:21+5:302018-12-30T01:48:39+5:30
वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या साकेत मायनेनीने पहिल्या पात्रता फेरीत तैपेईच्या जेसन जूंगचा ६-१, ५-७, ६-२ गुणांनी चुरशीच्या झालेल्या लढतीत पराभव करून महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत विजयी सलामी देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
पुणे : वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या साकेत मायनेनीने पहिल्या पात्रता फेरीत तैपेईच्या जेसन जूंगचा ६-१, ५-७, ६-२ गुणांनी चुरशीच्या झालेल्या लढतीत पराभव करून महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत विजयी सलामी देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
महाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत
आॅस्ट्रियाच्या सेबस्तियन आॅफनर याने दुसºया मानांकित बेल्जियमच्या रुबेन बेमेलमन्सचा ५-७, ६-३, ६-१ गुणांनी तीन सेटमध्ये पराभव करून अनपेक्षित निकाल नोंदविला.
इटलीच्या सातव्या मानांकित जियालुइजी क्वेनजी याने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या शशी कुमार मुकुंदचा ६-१, ६-१ गुणांनी एकतर्फी पराभव करून पात्रता फेरीच्या दुसºया चरणात प्रवेश केला. ब्राझीलच्या तिसºया मानांकित थायगो माँटेरोने जर्मनीच्या डॅनियल ब्रँड्सचा टायब्रेकमध्ये
७-६ (५), ७-५ असा पराभव करून आगेकूच केली.
सविस्तर निकाल : पहिली पात्रता फेरी : साकेत मायनेनी (भारत) वि.वि.जेसन जूंग (तैपेई) ६-१, ५-७, ६-२; सेबस्तियन आॅफनर (आॅस्ट्रिया) वि. वि. रुबेन बेमेलमन्स (बेल्जियम) ५-७, ६-३, ६-१; जियालुइजी क्वेनजी (इटली) वि. वि. शशी कुमार मुकुंद (भारत) ६-१, ६-१; थायगो माँटेरो (ब्राझील) वि. वि. डॅनियल ब्रँड्स (जर्मनी)
७-६ (५), ७-५; सिमॉन बोलेली (इटली) वि.वि. ब्रेडन चेन्यूर (कॅनडा) ६-३, ७-६ (५); अँटोनी हाँग (फ्रांस) वि. वि. आंद्रेज मार्टिन (स्लोव्हाकिया) ६-१, ६-२.
पहिल्या फेरीत प्रजनेशसमोर मायकेलचे आव्हान
भारताचा अव्वल मानांकित खेळाडू प्रजनेश गुन्नेश्वरणची एटीपी २५० वर्ल्ड टूर महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या मायकेल मोह याच्याशी लढत होणार आहे.
जागतिक क्र. १०३ असलेल्या प्रजनेश गुन्नेश्वरण आणि मायकेल मोह हे दोघेही (अलेक्झांडर वास्के टेनिस युनिव्हर्सिटी) या एकाच अकादमीत सराव करीत आहेत. पहिल्या फेरीत वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या पुण्याच्या अर्जुन कढे याचा सामना लासलो जेरे याच्याशी, तर भारताच्या रामकुमार रामनाथन पुढे जागतिक क्र. ९७ असलेल्या मार्सेल ग्रनॉलर्सचे आव्हान असणार आहे.
मुख्य ड्रॉच्या पहिल्या फेरीत केविन अँडरसन, हियोन चूँग, सिमॉन जाईल्स, मालेक झाजेरी या चार मानांकित खेळाडूंना पुढे चाल मिळाली आहे. दुहेरीत रोहन बोपन्ना-दिवीज शरण यांचा राडू अल्बोट-मालेज झाजेरी यांच्याशी, तर लिएंडर पेस व एम रियास वरेला यांचा सामना डी मरेरो व एच पॉडलिपिंक कॅस्टिलो या जोडीशी होणार आहे.
मुख्य फेरीचा ड्रॉ पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते काढण्यात आला. यावेळी स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे मानद सचिव सुंदर अय्यर, एटीपी सुपरवायझर मिरो ब्रातोव, एटीपी टूरचे व्यवस्थापक अर्नाऊ बृजेस, भारताचा प्रजनेश गुन्नेश्वरन, गतविजेता सिमॉन जाईल्स, आदी मान्यवर उपस्थित होते.