‘फेड कप हार्ट’ पुरस्कारासाठी सानिया मिर्झाला नामांकन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 04:18 AM2020-05-02T04:18:49+5:302020-05-02T04:19:06+5:30
२००३ सालापासून भारतीय टेनिस विश्वात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या सानियाला ‘फेड कप हार्ट’ पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे.
नवी दिल्ली : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झासाठी गुरुवारचा दिवस विशेष ठरला. २००३ सालापासून भारतीय टेनिस विश्वात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या सानियाला ‘फेड कप हार्ट’ पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे.
दखल घेण्याची बाब म्हणजे या पुरस्कारासाठी नामांकित झालेली सानिया ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी आशिया-ओशियानिक विभागातून इंडोनेशियाच्या प्रिस्का मेडेलिन नुग्रोहो हिच्यासह सानियाला नामांकन देण्यात आले आहे. सानियाने नुकतेच चार वर्षांनंतर फेड चषक स्पर्धेत पुनरागमन केले होते. या सामन्यादरम्यान प्रेक्षकांमध्ये तिचा १८ महिन्यांचा मुलगा इजहानही उपस्थित होता.
तीन विभागांतून एकूण सहा खेळाडूंना या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. युरोप-आफ्रिका विभागातून अॅनेट्ट कोंटावेट (इस्टोनिया) आणि एलेओनोरा मोलिनारो (लक्सेमबर्ग); अमेरिकन विभागातून पॅराग्वेच्या व्हेरोनिका केपेडे रॉय आणि मेक्सिकोच्या फर्नांडा कोट्रेरास गोमेज यांनाही नामांकन मिळाले आहे. या पुरस्काराचा विजेता निवडण्यासाठी १ ते ८ मे या कालावधीत मतदान होणार आहे. (वृत्तसंस्था)भारताला सर्वांत प्रथम फेड
चषक स्पर्धेच्या प्ले आॅफमध्ये प्रवेश मिळवून देण्यात सानियाने महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
>अखिल भारतीय टेनिस महासंघाच्या प्रसिद्धिपत्रकामध्ये सानियाने म्हटले की, ‘२००३ मध्ये मी पहिल्यांदा टीम इंडियाच्या जर्सीत कोर्टवर उतरली होती आणि तो दिवस माझ्यासाठी गौरवशाली होता. आतापर्यंत १८ वर्षांचा प्रवास झाला आहे. फेड चषकमध्ये आशिया-ओशियाना स्पर्धेतील मिळवलेला विजय हा आयुष्यातील सर्वांत मोठ्या यशापैकी एक आहे. मला फेड कप हार्ट पुरस्कारासाठी नामांकन दिल्याबद्दल
आभारी. हा क्षण माझ्यासाठी खास आहे.’