Sania Mirza Retire: अखेर सानिया मिर्झाने घोषणा केली; दुबईत शेवटची टेनिस चॅम्पिअनशिप खेळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2023 09:32 AM2023-01-07T09:32:31+5:302023-01-07T09:32:59+5:30
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत काडीमोडच्या कथित अफवांमध्ये भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने मोठी घोषणा केली आहे.
पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकसोबत काडीमोडच्या कथित अफवांमध्ये भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाने मोठी घोषणा केली आहे. सानियाने प्रोफेशनल टेनिस करिअरला गुडबाय करण्याचा निर्णय घेतला आहे. दुखापतीमुळे सानियाने हा निर्णय घेतला आहे. पुढील महिन्यात दुबई टेनिस चॅम्पिअनशिप ही अखेरची असल्याचे सानियाने म्हटले आहे.
ही चॅम्पियनशिप सानियाच्या कारकिर्दीतील शेवटची स्पर्धा असेल. ही दुबई टेनिस चॅम्पियनशिप १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. हा WTA 1000 कार्यक्रम असेल. या स्पर्धेत सानिया अखेरची खेळताना दिसणार आहे. 36 वर्षीय सानिया मिर्झाही दुहेरीत जागतिक क्रमवारीत नंबर 1 राहिली आहे.
सानियाने गेल्या वर्षीच ती 2022 च्या अखेरीस निवृत्त होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र दुखापतीमुळे ती यूएस ओपन खेळू शकली नाही. सानिया मिर्झा या वर्षातील पहिली ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन खेळणार आहे. यानंतर ती युएईमध्ये चॅम्पियनशिप खेळून निवृत्त होणार आहे.
सानियाने wtatennis.com ला ही माहिती दिली आहे. मागील वर्षी WTA फायनलनंतरच निवृत्ती घेण्याचा विचार केला होता. पण उजव्या कोपराच्या दुखापतीमुळे यूएस ओपन आणि उर्वरित स्पर्धेतून नाव मागे घ्यावे लागले. दुबई टेनिस चॅम्पियनशिपनंतर मी निवृत्ती घेण्याचा विचार करत असल्याचेही हेच कारण आहे.
सानिया मिर्झाला अर्जुन पुरस्कार (2004), पद्मश्री पुरस्कार (2006), राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (2015) आणि पद्मभूषण पुरस्कार (2016) ने देखील सन्मानित करण्यात आले आहे. सानियाने आतापर्यंत 6 मोठ्या चॅम्पियनशिपमध्ये पदके जिंकली आहेत.