यूएस ओपनमध्ये सेरेना, स्टीफन्स यांची उपांत्यपूर्व फेरीत धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 12:08 AM2018-09-04T00:08:58+5:302018-09-04T00:09:12+5:30
यूएस ओपनमध्ये सहावेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या सेरेना विलियम्सने बिगरमानांकित काइया कैनेपीचा रविवारी ६-०, ४-६, ६-३ ने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले.
न्यूयॉर्क : यूएस ओपनमध्ये सहावेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या सेरेना विलियम्सने बिगरमानांकित काइया कैनेपीचा रविवारी ६-०, ४-६, ६-३ ने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले.
२३ ग्रॅण्डस्लॅम जेतेपद पटकावणाºया सेरेनाने पहिल्या सेटमध्ये काइयाचा केवळ १८ मिनिटांमध्ये पराभव केला. पहिल्या फेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सिमोना हालेपचा पराभव करणाºया काइयाने दुसºया सेटमध्ये दमदार पुनरागमन करताना ६-४ ने सरशी साधत रंगत कायम राखली. तिसºया सेटमध्ये अनुभवी सेरेनाने प्रतिस्पर्धी खेळाडूला अधिक संधी न देत विजयावर शिक्कामोर्तब केले. सेरेनाला उपांत्यपूर्व फेरीत आठव्या मानांकित चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोव्हाच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. कॅरोनिलाने आॅस्ट्रेलियाच्या अॅशलिघ बार्टीचा ६-४, ६-४ ने पराभव केला.
विद्यमान चॅम्पियन व तिसरे मानांकन प्राप्त स्लोएन स्टीफन्सनेही उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले. तिने एलिस मर्टेन्सचा ६-३, ६-३ ने सहज पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत स्लोएनला लात्वियाच्या अनास्तासिजा सेवास्तोव्हाच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. सेवास्तोवाने उपउपांत्यपूर्व फेरीत सातव्या मानांकित एलिना स्वितोलिनाची झुंज ६-३, १-६, ६-० ने मोडून काढली. स्वितोलिनाच्या पराभवामुळे आता स्पर्धेत अव्वल १० पैकी केवळ दोन खेळाडू शिल्लक आहेत. (वृत्तसंस्था)
नदाल, डेल पेत्रो, इस्नरची आगेकूच
गतविजेत्या राफेल नदालने रविवारी आठव्यांदा अमेरिकन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. नदालला आता डोमिनिक थिएमच्या आव्हानाला सामोरे जावे लागले. नदाल २०१८ मध्ये केवळ तीन खेळाडूंविरुद्ध पराभूत झाला. त्यात थिएमचा समावेश आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नदालने निकोलोज बसिलाशविलीचा ६-३, ६-३, ६-७ (६/८), ६-४ ने पराभव केला. निकोलोज अमेरिकन ओपनच्या चौथ्या फेरीत दाखल होणारा जॉर्जियाचा पहिला खेळाडू आहे.