सेरेना विलियम्स पुनरागमन करण्यास उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 02:22 AM2018-03-07T02:22:53+5:302018-03-07T02:22:53+5:30

अमेरिकेची दिग्गज महिला टेनिसपटू सेरेना विलियम्स स्पर्धात्मक टेनिसमध्ये पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असून तिने डब्ल्यूटीए टूरमध्ये पुनरागमन करण्यासाठी जोर लावला आहे. ‘लवकरच टेनिस कोर्टवर पुनरागमन करुन शानदार कामगिरी करण्यास उत्सुक आहे,’ असा विश्वास सेरेनाने व्यक्त केला आहे.

 Serena Williams keen to come back | सेरेना विलियम्स पुनरागमन करण्यास उत्सुक

सेरेना विलियम्स पुनरागमन करण्यास उत्सुक

Next

न्यूयॉर्क - अमेरिकेची दिग्गज महिला टेनिसपटू सेरेना विलियम्स स्पर्धात्मक टेनिसमध्ये पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असून तिने डब्ल्यूटीए टूरमध्ये पुनरागमन करण्यासाठी जोर लावला आहे. ‘लवकरच टेनिस कोर्टवर पुनरागमन करुन शानदार कामगिरी करण्यास उत्सुक आहे,’ असा विश्वास सेरेनाने व्यक्त केला आहे.
२३ ग्रँडस्लॅम विजेती सेरेना या आठवड्यात सुरु होणाºया इंडियन वेल्स हार्डकोर्ट टेनिस स्पर्धेत सहभागी होईल. विशेष म्हणजे गेल्यावर्षी आॅस्टेÑलियन ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावयानंतर सेरेनाची ही पहिलीच स्पर्धा असेल. गतवर्षी गर्भवती असताना सेरेनाने मेलबर्न येथे जेतेपदाचा चषक उंचावला होता. यानंतर सेरेना टेनिसपासून दूर राहिली आणि सप्टेंबरमध्ये मुलगी ओलिम्पिया हिला जन्म दिल्यानंतर आता ती पुनरागमनाच्या तयारीमध्ये गुंतली आहे. दरम्यान, सेरेनाने मोठी बहिण व्हिनस विलियम्ससह सोमवारी रात्री मेडिसन स्क्वायर गार्ड येथे झालेल्या टायब्रेक स्पर्धेत सहभाग घेतला होता. आठ महिला खेळाडूंचा सहभाग असलेल्या या प्रदर्शनीय स्पर्धेत नियमित गेम व सेट ऐवजी १० गुणांचा टायब्रेकर सामना खेळवला जातो. स्पर्धेत शानदार सुरुवात केलेल्या सेरेनाला उपांत्य सामन्यात मात्र पराभवाचा सामना करावा लागला. (वृत्तसंस्था)

1या स्पर्धेत युक्रेनच्या एलिना स्वितोलिनाने जेतेपदाला गवसणी घालताना चीनच्या झांग शुआईला १०-३ असे नमविले. एलिनाने स्पर्धेत व्हिनस आणि कोको वांदेवेघे यांना पराभवाचा धक्का दिला.
2या स्पर्धेच्या निमित्ताने सेरेनाने यंदाच्या वर्षी पहिला एकेरी सामना खेळला. मागच्या महिन्यात सेरेनाने मोठी बहिण व्हिनससह फेड चषक स्पर्धेत दुहेरीचा सामना खेळला होता. मात्र, त्या सामन्यात विलियम्स भगिनींचा पराभव झाला होता. इंडियन वेल्स स्पर्धेत सेरेना बिगरमानांकीत खेळाडू
म्हणून सहभागी होणार असून सलामीला ती कझाखस्तानची
५३व्या स्थानावर असलेल्या झरिना डियासविरुद्ध सलामीचा
सामना खेळेल.

मला आता ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवायचे आहे. मला वाटतं की प्रत्येकाने मोठ्या अपेक्षा ठेवल्या पाहिजेत. मी हाच संदेश देऊ इच्छिते. मी पुनरागमन करण्यास खूप उत्सुक आहे.
- सेरेना विलियम्स

सेरेनामध्ये खूप ताकद असून तिच्यात खूप क्षमताही आहे. तिला खेळाचे पुरेपूर ज्ञान आहे. टायब्रेकर स्पर्धेतील सामना शानदार ठरला.
- व्हिनस विलियम्स

Web Title:  Serena Williams keen to come back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.