रणनीती हेच माझ्या खेळाचे बलस्थान, कोर्टवरील परिस्थितीवरून खेळ : सिमोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 01:30 AM2018-01-08T01:30:53+5:302018-01-08T01:31:11+5:30

मारिन सिलीच व केविन अ‍ॅँडरसन या दिग्गज खेळाडूंना पराभूत करीत जाईल्स सिमोन याने आपला दबदबा निर्माण केला आहे. नुकत्याच झालेल्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे जेतेपद त्याने पटकाविले आहे.

Strategy is my game's strength, the game on the courtesy: Simon | रणनीती हेच माझ्या खेळाचे बलस्थान, कोर्टवरील परिस्थितीवरून खेळ : सिमोन

रणनीती हेच माझ्या खेळाचे बलस्थान, कोर्टवरील परिस्थितीवरून खेळ : सिमोन

googlenewsNext

पुणे : मारिन सिलीच व केविन अ‍ॅँडरसन या दिग्गज खेळाडूंना पराभूत करीत जाईल्स सिमोन याने आपला दबदबा निर्माण केला आहे. नुकत्याच झालेल्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेचे जेतेपद त्याने पटकाविले आहे.
तो म्हणाला, ‘मी रणनीती तयार करताना प्रशिक्षकाची मदत घेत नाही. रणनीती हा माझ्या खेळाचा महत्त्वपूर्ण घटक आहे. माझे यापूर्वीचे प्रशिक्षक रणनीती बनविण्यात तरबेज होते.’ जागतिक क्रमवारीत ८९ व्या क्रमांकावर असणारा सिमोन आपल्या सहयोगी स्टाफशिवाय भारतात आला होता. त्याने नुकतेच आपले प्रशिक्षक यान डी विट, मानसिक प्रशिक्षक रोनक्स लाफेक्स व शारीरिक प्रशिक्षक मिलोस जेलिसाविच यांच्याशी नाते तोडले आहे.
तो म्हणाला, ‘कोर्टवरील परिस्थिती माझ्या लवकर लक्षात येते, ही माझी जमेची बाजू आहे. मी या आठवड्यात जसे खेळलो तर मी आणखी चांगली कामगिरी करू शकेन.’ आपल्या कारकिर्दीत राफेल नदाल व रॉजर फेडरर यांना पराभूत करणाºया सिमोन याने अंतिम सामन्यात अ‍ॅँडरसनला पराभूत केले. यापूर्वीचे तीनही सामने अ‍ॅँडरसनने जिंकले होते.
अ‍ॅँडरसनला पराभूत करण्यासाठी काही विशेष योजना होती का, असे विचारले असता तो म्हणाला, ‘मी काही गोष्टींमध्ये बदल केला होता. त्याची सर्व्हिस चांगली असल्यामुळे माझा रिटर्न चांगला असला पाहिजे, याकडे मी लक्ष दिले.’

Web Title: Strategy is my game's strength, the game on the courtesy: Simon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.