US open 2018: राफेल नदालने सामना अर्ध्यावर सोडला, डेल पोत्रो- जोकोव्हिच जेतेपदाची लढत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 12:00 PM2018-09-08T12:00:01+5:302018-09-08T12:00:28+5:30
US Open 2018: गतविजेत्या राफेल नदालने अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीची लढत अर्ध्यावर सोडली. त्यामुळे अर्जेंटिनाच्या ज्युआन डेल पोत्रोला अंतिम फेरीत प्रवेश करता आला.
न्यूयॉर्क, अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धाः गतविजेत्या राफेल नदालने अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीची लढत अर्ध्यावर सोडली. त्यामुळे अर्जेंटिनाच्या ज्युआन डेल पोत्रोला अंतिम फेरीत प्रवेश करता आला. 2009नंतर प्रथमच डेल पोत्रोला अमेरिकन ओपन जिंकण्याची संधी आहे आणि त्याच्यासमोर नोव्हाक जोकोव्हिचचे आव्हान असणार आहे. जोकोव्हिचने उपांत्य फेरीत केई निशिकोरीवर विजय मिळवला.
Unfortunately, Rafa Nadal has retired after 2 sets in the semifinals, sending Juan Martin del Potro through to the final...#USOpenpic.twitter.com/uegztbgIyl
— US Open Tennis (@usopen) September 7, 2018
स्पेनचा नदाल आणि अर्जेंटिनाचा डेल पोत्रो यांच्यातील पहिल्या उपांत्य फेरीत डेल पोत्रोने 7-6(7/3), 6-2 अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे नदाल चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होतेच, परंतु त्याचवेळी त्याच्याकडून जबरदस्त पुनरागमनाचीही अपेक्षा होती. मात्र, दुसरा सेट संपताच नदालची दुखापत त्रास देऊ लागली आणि त्याने सामना अर्ध्यावर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे डेल पोत्रोला 2009नंतर प्रथमच अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश करण्यात यश आले.
9 years later:@delpotrojuan will contest his 2nd Grand Slam final here in Flushing Meadows.
— US Open Tennis (@usopen) September 7, 2018
The 2009 champion awaits the winner of Djokovic/Nishikori...#USOpenpic.twitter.com/lPhFY8AafG
दुसऱ्या उपांत्य फेरीत सर्बियाच्या जोकोव्हिचने 2 तास 23 मिनिटांत जपानच्या निशिकोरीचे आव्हान 6-3, 6-4, 6-2 असे परतवून लावले.
WHAT. A. FINISH.@djokernole reaches his 8th final in Flushing Meadows (23rd overall) after defeating Nishikori 6-3, 6-4, 6-2!#USOpenpic.twitter.com/vXIUeiPqD4
— US Open Tennis (@usopen) September 8, 2018