यूएस ओपन : मारिया शारापोवा तिस-या फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 04:01 AM2017-09-01T04:01:20+5:302017-09-01T04:01:29+5:30
जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू आणि १५ वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन केलेल्या मारिया शारापोवाने आपला दर्जेदार खेळ कायम राखताना यूएस ओपन स्पर्धेच्या तिस-या फेरीत प्रवेश केला.
न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू आणि १५ वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन केलेल्या मारिया शारापोवाने आपला दर्जेदार खेळ कायम राखताना यूएस ओपन स्पर्धेच्या तिस-या फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी, नवोदित अलेक्झांडर ज्वेरेव आणि निक किर्गियोस यांना स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागला.
स्टार खेळाडू शारापोवाने बंदीनंतर पुनरागमन करताना पहिल्याच ग्रँडस्लॅममध्ये जागतिक क्रमवारीत दुसºया स्थानी असलेल्या सिमोना हालेप हिला धक्का देत दिमाखदार पुनरागमन केले. यानंतर तिने हंगरीच्या ५९व्या मानांकीत टिमिया बाबोस हिचा ६-७ (४-७), ६-४, ६-१ असा पराभव करुन तिसºया फेरीत प्रवेश केला. आर्थर अॅश स्टेडियममध्ये झालेल्या या चुरशीच्या सामन्यात शारापोवाने पहिला सेट गमावल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करत आपला हिसका दाखवाला. दुसरीकडे, आॅगस्ट महिन्यातंच झालेल्या मँट्रीयल स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिग्गज रॉजर फेडररला नमवलेल्या आणि या मोसमात ५ एटीपी विजेतेपद पटकावलेल्या ज्वेरेवला स्पर्धेबाहेर पडावे लागले. चौथ्या मानांकीत ज्वेरेवला क्रोएशियाच्या ६१व्या मानांकीत बोर्ना कोरिच याने ३-६, ७-५, ७-६(७-१), ७-६(७-४) असे नमवले. १४व्या मानांकीत निक किर्गियोसला पहिल्याच सामन्यात २३५व्या मानांकीत आॅस्टेÑलियाच्या जॉन मिलमैन याने ६-३, १-६, ६-४, ६-१ असा धक्का दिला. यंदा विम्बल्डनमध्ये उपविजेतेपद जिंकलेल्या पाचव्या मानांकीत मारिन सिलिचने जर्मनीच्या फ्लोरियन मेयरला ६-३, ६-३, ६-३ असे नमवत तिसºया फेरीत प्रवेश केला. कॅनडाच्या १८वर्षीय डेनिस शापोवालोव याने धक्कादायक निकाल नोंदवताना फ्रान्सच्या आठव्या मानांकीत ज्यो-विल्फ्रेड त्सोंगा याला ६-४, ६-४, ७-६(७-३) असा धक्का देत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. (वृत्तसंस्था)
महिलांमध्ये विम्बल्डन चॅम्पियन गर्बाइन मुगुरुझाने तिसºया फेरीत प्रवेश करताना चीनच्या दुआन यिंग यिंग हिचा ६-४, ६-० असा धुव्वा उडवला. रशियाची आठवी मानांकीत स्वेतलाना कुझ्नेत्सोवा हिनेही दुसरी फेरी गाठताना झेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोंद्रोउसोवाला ४-६, ६-४, ७-६(७-२) असे नमवले. तसेच, सात ग्रँडस्लॅम पटकावलेल्या अमेरिकेच्या व्हिनस विलियम्सने फ्रान्सच्या ओसियाने डोडिन हिला ७-५, ६-४ असे नमवून विजयी कूच केली. चौथ्या मानांकीत युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिनेही विजयी कूच करताना रशियाच्या एवजिनिया रोडिना हिला ६-४, ६-४ असे नमवले. तसेच, अमेरिकेच्या जेनिफर ब्रेडीने अनपेक्षित विजय मिळवताना झेक प्रजासत्ताकच्या २३व्या मानांकीत बार्बोरा स्ट्रीकोवाचा ६-१, ६-१ असा धुव्वा उडवला.
कॅ नडाचा डेनिस शापोवालोव ८व्या मानांकित फ्रान्सच्या
जो-विल्फ्रे ड सोंगाविरूद्ध परतीचा फटका मारताना. २ तास १२ मी.च्या चुरशीच्या झालेल्या या लढतीत डेनिसने ६-४, ६-४, ७-६ (७-३) जो-विल्फ्रेडचा असा पराभव केला.