US Open Tennis 2018: नोव्हाक जोकोव्हिचचा उपांत्य फेरीत सहज प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2018 09:54 AM2018-09-06T09:54:29+5:302018-09-06T09:58:52+5:30
US Open Tennis 2018: सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने अमेरिकन ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सहज प्रवेश केला.
अमेरिक ओपन टेनिस स्पर्धाः सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने अमेरिकन ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत सहज प्रवेश केला. त्याने पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या जॉन मिलमनचा 6-3, 6-4, 6-4 असा सरळ सेटमध्ये अवघ्या 2 तास 48 मिनिटांत पराभव केला. जोकोव्हिचने सलग 11 वेळा अमेरिकन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
Feel the roar of the Flushing Meadows crowd...@DjokerNole reaches his 11th #USOpen semifinal under the lights in Arthur Ashe Stadium! pic.twitter.com/CqbIi6dLhk
— US Open Tennis (@usopen) September 6, 2018
दिग्गज खेळाडू रॉजर फेडररला पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणाऱ्या मिलमनचा प्रवास संपुष्टात आला. जोकोव्हिचसमोर उपांत्य फेरीत जपानच्या केई निशिकोरीचे आव्हान असणार आहे. निशिकोरीने सातव्या मानांकित मारिन सिलिचवर 2-6, 6-4, 7-6 (7/5), 4-6, 6-4 असा चुरशीच्या सामन्यात विजय मिळवला. दुसऱ्या उपांत्य फेरीत राफेल नदाल आणि जुआन डेल पोत्रो यांच्यात चुरस रंगणार आहे.
The Djoker Prevails!@DjokerNole gets past Millman 6-3, 6-4, 6-4 to set up a semifinal encounter against Kei Nishikori...#USOpenpic.twitter.com/NE59ZndaE6
— US Open Tennis (@usopen) September 6, 2018
महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या नाओमी ओसाकाने 6-1, 6-1 अशी फरकाने युक्रेनच्या लेसीया त्सुरेंकोचा, तर अमेरिकेच्या मॅडीसन कीने 6-4, 6-3 अशा फरकाने स्पेनच्या कार्ला सुआरेझ नाव्हारोचा पराभव केला.
.@madison_keys reaches the 3rd semifinal in her last 5 Major appearances as she defeats Suarez-Navarro 6-4, 6-3 under the lights!#USOpenpic.twitter.com/VOGVMyJKCp
— US Open Tennis (@usopen) September 6, 2018