यूएस ओपन टेनिस : सेरेनाचा सहज विजय, मरे, दिमित्रोव्ह पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2020 05:03 AM2020-09-05T05:03:06+5:302020-09-05T05:03:58+5:30
आपले २४ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक असलेल्या सेरेना विलियम्सने सरळ सेट््समध्ये विजय मिळवत यूएस ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला
न्यूयॉर्क : आपले २४ वे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावण्यासाठी उत्सुक असलेल्या सेरेना विलियम्सने सरळ सेट््समध्ये विजय मिळवत यूएस ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला, पण अनुभवी अँडी मरे व ग्रिगोर दिमित्रोव्ह यांना पुरुष एकेरीत गाशा गुंडाळावा लागला.
स्टीफन्सने दुसºया फेरीत ओल्गा गोर्वात्सोव्हाचा ६-२, ६-२ ने पराभव केला. सेरेनाची स्टीफन्सविरुद्धची कामगिरी ५-१ अशी आहे. या दोघींदरम्यान यापूर्वी शेवटची लढत २०१५ च्या फे्रंच ओपनमध्ये झाली होती. स्टीफन्सने २०१३ मध्ये आॅस्ट्रेलिया ओपनमध्ये सेरेनाविरुद्ध अखेरचा विजय मिळवला होता. पुरुष विभागात गेल्या वर्षीचा उपविजेता दानिल मेदवेदेवने ११६ वे मानांकन असलेल्या आॅस्ट्रेलियाच्या ख्रिस्टोफर ओकोनेलचा ६-३, ६-२, ६-४ ने पराभव केला. तिसरी फेरी गाठणाºया अन्य खेळाडूंमध्ये सहावे मानांकन प्राप्त मॅटियो बेरटिनी, आठवे मानांकन प्राप्त रॉबर्ट बातिस्ता आगुट, १० वे मानांकन प्राप्त आंद्रई रुबलेव्ह, ११ वे मानांकन प्राप्त कोरेन काचनोव्ह, २०१४ चा चॅम्पियन मारिन सिलीच आदींचा समावेश आहे. पण अँडी मरे, १४ व्या मानांकित ग्रिगोर दिमित्रोव्ह व २५ व्या मानांकित मिलोस राओनिच यांना पराभव स्वीकारावा लागला. दिमित्रोव्हला हंगेरीच्या मार्टन फुस्कोविक्सने ६-७(५), ७-६(४), ३-६, ६-४, ६-१ ने पराभूत केले.
(वृत्तसंस्था)
‘बर्थ डे बॉय’ थीमकडून नागल पराभूत
न्यूयॉर्क : सुमित नागलने सामन्यात संघर्षपूर्ण खेळ केला खरा, पण अखेर त्याला २७ वा वाढदिवस साजरा करीत असलेल्या थीमकडून पराभव स्वीकारावा लागला. या निकालामुळे नागलचे यूएस ओपनमधील पुरुष एकेरीतील आव्हान संपुष्टात आले. तिसºया स्थानावर असलेल्या थीमने सरळ तीन सेट््समध्ये नागलचा ६-३, ६-३, ६-२ ने पराभव करीत तिसरी फेरी गाठली.
नागलने टिष्ट्वट केले,‘आभार, २०२० यूएस ओपन. बरेच काही शिकायला मिळाले. मेहनत घेणे सुरूच ठेवणार. समर्थनासाठी सर्वांचे आभार.’ नागलने पहिल्या फेरीत विजय मिळवला होता. ग्रँडस्लॅम स्पर्धेत गेल्या सात वर्षांत पहिल्या फेरीत विजय मिळविणारा पहिला भारतीय ठरला होता.
२३ ग्रँडस्लॅम विजेतेपदापैकी ६ ग्रँडस्लॅम जेतेपद येथे जिंकणाºया सेरेनाने गुरुवारी रात्री आर्थर अॅश स्टेडियममध्ये जागतिक क्रमवारीत ११७ व्या स्थानावर असलेल्या रशियाच्या मारग्रिटा गैस्पारयानचा ६-२, ६-४ ने पराभव केला.
सेरेनाला यानंतरच्या फेरीत २०१७ मध्ये यूएस ओपनची चॅम्पियन व येथे २६ वे मानांकन असलेल्या सेलोनी स्टीफन्सच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
महिला विभागात नवव्या मानांकित योहाना कोंटाला सोरेना क्रिस्टियाने २-६, ७-६(५), ६-४ ने, गर्बाइन मुगुरुजाला स्वेताना पिरोनकोव्हाने ७-५, ६-३ ने पराभूत केले. बेलारुसच्या व्हिक्टोरिया अजारेंकाने मायदेशातील सहकारी व पाचवे मानांकन प्राप्त आर्यना सबालेंकाचा ६-१, ६-३ ने पराभव केला.