ऑस्ट्रेलियन ओपन, प्लिस्कोवाचा सेरेना विल्यम्सवर विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 04:10 AM2019-01-24T04:10:45+5:302019-01-24T04:10:55+5:30
सेरेना विल्यम्सला बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पराभवाचा धक्का बसला.
मेलबर्न : सेरेना विल्यम्सला बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पराभवाचा धक्का बसला. त्यासोबतच सेरेनाला २४वे ग्रॅण्डस्लॅम जिंकून विक्रम करण्यासाठी आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे. तिला कॅरोलिना प्लिस्कोवा हिने पराभूत केल,े तर पुरुष एकेरीत नोवाक जोकोविच उपांत्य फेरीत पोहोचला आहे.
अमेरिकन दिग्गज खेळाडू सेरेना हिने चौथ्या फेरीत सिमोना हालेप हिला पराभूत केले होते. मात्र, चेक प्रजासत्ताकच्या सातव्या मानांकित प्लिस्कोवा विरोधात संघर्षपूर्ण सामन्यात तिला ६-४, ४-६, ७-५ असा पराभव पत्करावा लागला. सेरेनाला तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये चार मॅच पॉर्इंट मिळाले होते. मात्र, प्लिस्कोवाने सर्व पॉर्इंट वाचवत अखेर उपांत्य फेरीत प्रवेश केला.
प्लिस्कोवा हिला अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी जपानच्या नाओमी ओसाका विरोधात लढावे लागेल. चौथ्या मानांकन प्राप्त ओसाका हिने दुखापतग्रस्त इलिना स्वेतलाना हिला ६-४, ६-१ असे पराभूत केले.
विश्व नंबर वन जोकोविच याला उपांत्यपूर्व फेरीत जास्त मेहनत घ्यावी लागली नाही. दुखापतीमुळे केई निशिकोरी याने सामन्यातून माघार घेतली. विक्रमी सातव्या आॅस्ट्रेलियन ओपन विजेतेपद पटकाविण्यासाठी उत्सुक असलेल्या जोकोविच याला उपांत्य फेरीत फ्रान्सच्या लुकास पोऊलीविरोधात खेळावे लागेल. त्याने मिलोस राओनिकला पराभूत केले. पोऊली पहिल्यांदाच कोणत्याही ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. प्लिसकोवा तिसºयांदा ग्रॅण्डस्लॅमच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे. ती २०१७मध्ये फ्रेंच ओपन आणि गेल्या वर्षी अमेरिकन ओपनच्या अंतिम चारमध्ये पोहोचली होती.
सेरेनाचा हा पराभव निराशाजनक होता. कारण ती एकवेळ तिसºया सेटमध्ये ५-१ अशी पुढे होती आणि सर्व्हिसही तिच्याकडेच होती. मात्र, काही चुकीच्या शॉटमुळे तिचा पराभव झाला. सेरेना म्हणाली की, ‘मी मॅच पॉर्इंटवर चुका केल्या. मी आक्रमक खेळ करीत होते, तर तिने योग्य शॉट लगावले.’ दुसरीकडे ओसाका ही किमीको डेटनंतर आॅस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत पोहोचणारी पहिली जपानी खेळाडू बनली आहे. ती अमेरिकन ओपननंतर सलग दुसºयांदा ग्रॅण्डस्लॅमच्या उपांत्य फेरीत पोहोचली आहे.