तो रॉजर फेडरर असला म्हणून काय झालं, सर्वांना नियम सारखेच; पाहा हा व्हिडीओ...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 06:29 PM2019-01-19T18:29:45+5:302019-01-19T18:30:17+5:30
हा सारा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे आणि ऑस्ट्रेलियन ओपनने आपल्या ट्विटर हँडलवर तो पोस्टही केला आहे.
सिडनी, ऑस्ट्रेलियन ओपन : कोणी कितीही मोठा असला तरी सर्वांना सारखेच नियम लागू व्हायला हवे. या गोष्टीचा प्रत्यय ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत आला. आतापर्यंत 20 ग्रँडस्लॅम जेतेपदे जिंकणाऱ्या रॉजर फेडररला हा अनुभव आला आहे.
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा सुरु असताना फेडररला चेजिंग रुममध्ये जायचे होते. पण या रुमवर जाण्यापूर्वी एक गेट लागतो आणि या गेटवर एक सुरक्षारक्षक होता. फेडरर या गेटमधून आतमध्ये जाणार एवढ्यात त्या सुरक्षारक्षकांनी फेडररला थांबवले आणि त्याचे ओळखपत्र विचारले. यावेळी फेडररकडे ओळखपत्र नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सुरक्षारक्षकाने फेडररला चेजिंग रुममध्ये प्रवेश करू दिला नाही. फेडररनेही सुरक्षारक्षकाचे ऐकले आणि तो थांबला. काही वेळातच फेडररचे प्रशिक्षक आले. त्यांच्याकडे फेडररचे ओळखपत्र होते. हे ओळखपत्र दाखवल्यावरच फेडररला गेटमधून पुढे सोडण्यात आले. हा सारा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला आहे आणि ऑस्ट्रेलियन ओपनने आपल्या ट्विटर हँडलवर तो पोस्टही केला आहे.
हा पाहा व्हिडीओ
Even @rogerfederer needs his accreditation 😂#AusOpen (via @Eurosport_UK)
— #AusOpen (@AustralianOpen) January 19, 2019
pic.twitter.com/oZETUaygSE
सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा सुरु आहे. कोहली हा अव्वल टेनिसपटू रॉजर फेडररचा फॅन आहे. यापूर्वीही कोहली विम्बल्डन स्पर्धा सुरु असताना फेडररचा खेळ पाहायला गेला होता. आता तर त्याने चक्क फेडररची भेट घेतली आहे. विराट आणि अनुष्का यांनी फेडररबरोबर एक फोटो काढला आहे. विराटने हा फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.