US Open Tennis : फेडररला झुंजवणारा भारताचा सुमित नागल आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2019 11:13 AM2019-08-27T11:13:13+5:302019-08-27T11:19:44+5:30

भारताच्या 22 वर्षीय सुमित नागलने मंगळवारी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत इतिहास घडवला.

Who is Sumit Nagal, the 22-year-old from Haryana Who Just Won a Set Against Roger Federer at US Open | US Open Tennis : फेडररला झुंजवणारा भारताचा सुमित नागल आहे तरी कोण?

US Open Tennis : फेडररला झुंजवणारा भारताचा सुमित नागल आहे तरी कोण?

googlenewsNext

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा : भारताच्या 22 वर्षीय सुमित नागलने मंगळवारी अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत इतिहास घडवला. रॉजर फेडररसारखा दिग्गज प्रतिस्पर्धी समोर असतानाही सुमितनं मोठ्या धाडसानं खेळ केला आणि जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडले. पाच वेळा अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकणाऱ्या फेडररने हा सामना 4-6, 6-1, 6-2, 6-4 असा जिंकला खरा, परंतु सुमितनं पहिला सेट जिंकून धमाकाच केला. ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात फेडरर समोर असतानाही सुमितनं पहिला सेट घेत सर्वांना अवाक् केले. 

भारताचा वीर टेनिस सम्राट फेडररला काँटे की टक्कर देतो तेव्हा...

कोण आहे सुमित नागल
16 ऑगस्ट 1997 साली हरयाणाच्या जझ्झर येथे जन्मलेल्या सुमितने 2015मध्ये विम्बल्डन स्पर्धेतील मुलांच्या दुहेरी गटाचे जेतेपद पटकावले होते. त्याने व्हिएतनामच्या ली होआंग नामसोबत ही कामगिरी केली होती. कनिष्ठ गटाचे ग्रँड स्लॅम नावावर करणारा सुमित हा सहावा भारतीय खेळाडू ठरला. 2016मध्ये त्याने भारताच्या डेव्हिच चषक संघात पदार्पण केले. नवी दिल्ली येथे झालेल्या वर्ल्ड ग्रुप प्ले ऑफ फेरीत तो स्पेनविरुद्ध खेळला होत. सुमितने या वर्षात मोठी भरारी घेतली. वर्षाच्या सुरुवातीला जागतिक क्रमवारीत 361वरून त्यानं 190व्या स्थानापर्यंत झेप घेतली. त्याने सलग सात स्पर्धांच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला.   


2008मध्ये भारताच्या ग्रँड स्लॅम स्पर्धेसाठी निवडलेल्या 14 खेळाडूंमध्ये सुमितचा समावेश होता. महेश भुपती आणि कॅनडाचे प्रशिक्षक बॉबी महाल यांनी सुमितला हेरले. सुमितच्या या यशाचे श्रेय त्याचे वडील भुपतीला देतात.  2011मध्ये भुपतीच्या मार्गदर्शनाखाली सुमितने सरावाला सुरुवात केली आणि त्यानंतर तो कॅनडात गेला. तीन वर्ष कॅनडामध्ये राहिल्यानंतर 2014मध्ये सुमित जर्मनीला गेला आणि तेथे अर्जेंटिनाचे प्रशिक्षक मारिआनो डेल्फीनो यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानं सरावाला सुरुवात केली. 

Web Title: Who is Sumit Nagal, the 22-year-old from Haryana Who Just Won a Set Against Roger Federer at US Open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.