Wimbledon 2018: अँजेलिना अजिंक्य, 'सुपरमॉम' सेरेनाचा स्वप्नभंग!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 10:06 PM2018-07-14T22:06:44+5:302018-07-14T22:07:15+5:30
जर्मनीच्या अँजेलिका कर्बरने 6-3, 6-3 अशा फरकाने अवघ्या 1 तास 5 मिनिटांत सुपरमॉम सेरेनाचा स्वप्नभंग केला.
लंडन - बाळंतपण झाल्यानंतर वर्षभरातच टेनिस कोर्टवर परतलेल्या सेरेना विल्यम्सला शनिवारी धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. आपल्या चिमुकल्या मुलीपासून दूर राहून ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळण्याचा तिचा निर्णय धाडसी होता. पण, तिच्यातल्या आईला सतत आपल्या मुलीची आठवण होत होती. त्यातही जिद्दीने खेळ करत सेरेनाने विम्बल्डनच्या अंतिम फेरीत धडक दिली. पण, तिच्या नशिबात जेतेपदाचा चषक उंचावणे नव्हते. जर्मनीच्या अँजेलिका कर्बरने 6-3, 6-3 अशा फरकाने अवघ्या 1 तास 5 मिनिटांत सुपरमॉम सेरेनाचा स्वप्नभंग केला.
The moment @AngeliqueKerber won #Wimbledon for the first time 🏆#TakeOnHistorypic.twitter.com/GsySRMNXaq
— Wimbledon (@Wimbledon) July 14, 2018
2016 च्या विम्बल्डनमध्ये सेरेनाकडून पराभव पत्करावा लागल्याने कर्बरला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. त्याची परतफेड करताना कर्बरने इतिहास घडवला. 1996 साली स्टेफी ग्राफनंतर विम्बल्डनमधील महिला एकेरीचे जेतेपद पटकावणारी ती पहिली जर्मन खेळाडू ठरली.
Following in great footsteps 🇩🇪@AngeliqueKerber beats Serena Williams 6-3, 6-3 to become the first German to win a #Wimbledon singles title since Steffi Graf in 1996 🏆#TakeOnHistorypic.twitter.com/UwmpYbXZyR
— Wimbledon (@Wimbledon) July 14, 2018
A touching end to a fantastic tournament#Wimbledonpic.twitter.com/EUjeQJJUFa
— Wimbledon (@Wimbledon) July 14, 2018