WIMBLEDON 2018 : फेडररच्या बाबतीत ' हे ' आजपर्यंत झाले नव्हते
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 10:55 PM2018-07-11T22:55:13+5:302018-07-11T22:56:02+5:30
फेडररला दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनने धक्का दिला. त्यामुळे फेडररचे जेतेपदाचे स्वप्न भंगले. यापूर्वी फेडरर विम्बल्डनमध्ये बऱ्याचदा पराभूत झाला आहे, पण फेडररच्या बाबतीत ' हे ' आजपर्यंत झाले नव्हते.
लंडन : विम्बल्डन स्पर्धा म्हणजेच रॉजर फेडरर असं एक समीकरण यावर्षीही पाहायला मिळतं होतं. त्यामुळे फेडरर यावेळीही जेतेपद पटकावणार, असं त्याचा खेळ पाहून बरीच जणं म्हणत होती. पण फेडररला दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनने धक्का दिला. त्यामुळे फेडररचे जेतेपदाचे स्वप्न भंगले. यापूर्वी फेडरर विम्बल्डनमध्ये बऱ्याचदा पराभूत झाला आहे, पण फेडररच्या बाबतीत ' हे ' आजपर्यंत झाले नव्हते. या सामन्यात ती गोष्ट पाहायला मिळाली आणि त्यानंतर फेडररच्या पराभवाचा आरंभ झाला.
फेडररने या सामन्यात दोन्ही सेट जिंकले होते. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्येही फेडरर 5-4 असा आघाडीवर होता आणि त्यानंतरच्या सेटमध्ये फेडररने पहिल्या ड्युसमध्ये आघाडीही घेतली होती. त्यावेळी फेडलला मॅच पॉइंट मिळाला होता. त्यावेळी जर फेडररने एक गुण मिळवला असता तर त्याला उपांत्य फेरीत प्रवेश करता आला असता.
आजपर्यंतचा इतिहास असा सांगतो की, फेडररने विम्बल्डनमध्ये कधीही मॅच पॉइंट गमावलेला नाही. आतापर्यंत फेडरनने विम्बल्डनमध्ये पहिल्यांदाच मॅच पॉइंट गमावावा लागला. फेडररने विम्बल्डनध्ये मॅच पॉइंट गमावण्याची ही पहिलीच वेळ होती. फेडररने हा गुण गमावला आणि त्यानंतर फेडररच्या पराभवाची पटकथा लिहायला सुरुवात झाली.
फेडररने मॅच पॉइंट गमावला हा तो क्षण, पाहा व्हिडीओ
The thin line between victory and defeat.
— Wimbledon (@Wimbledon) July 11, 2018
Until today, Roger Federer had never lost at #Wimbledon having held match point... pic.twitter.com/GXtjW8Dkr7