Wimbledon 2018 : 'ड्रीम फायनल'ची शक्यता; फेडरर-नदालची टक्कर थेट अंतिम फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 06:41 PM2018-06-29T18:41:43+5:302018-06-29T18:42:51+5:30
रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या टेनिस विश्वातील दोन कट्टर प्रतिस्पर्धींचा खेऴ म्हणजे क्रीडाप्रेमींसाठी पर्वणीच... त्यात हे दोघे एकमेकांसमोर आले, तर सुवर्ण योगच.विम्बल्डन स्पर्धेतही अशीच संधी मिऴणार आहे.
विम्बल्डन - रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या टेनिस विश्वातील दोन कट्टर प्रतिस्पर्धींचा खेऴ म्हणजे क्रीडाप्रेमींसाठी पर्वणीच... त्यात हे दोघे एकमेकांसमोर आले, तर सुवर्ण योगच. त्यांच्यातील चुरस ही टेनिसप्रेमींना खेळाचा मनमुराद आस्वाद देते. विम्बल्डन स्पर्धेतही अशीच संधी मिऴणार आहे. उपांत्यपूर्व, उपांत्य फेरीत नव्हे तर थेट अंतिम फेरीत फेडरर आणि नदाल भिडण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी स्पर्धेचा ड्रॉ जाहीर करण्यात आला. विम्बल्डन स्पर्धेचे विक्रमी 9वे जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज असलेल्या फेडररला पहिल्या फेरीत सर्बियाच्या दुसान लाजोव्हिकचा, तर नदालला डुडी सेलाचा सामना करावा लागणार आहे. या दोन्ही खेऴाडूंनी एक एक टप्पा पार केल्यास अंतिम फेरीत ते एकमेकांसमोर येतील.
For the eighth time, @rogerfederer comes into The Championships as the defending champion.
— Wimbledon (@Wimbledon) June 29, 2018
But will 2018 lead to title No.9? Here's his projected route according to ranking...#Wimbledonpic.twitter.com/DqDXVQth8J
फेडररने 2017 च्या विम्बल्डन स्पर्धेत क्रोएशियाच्या मारीन चिलिचला नमवून जेतेपद नावावर केले होते. यंदा उपांत्य फेरीत हे खेऴाडू समोरासमोर येतील. महिला गटात गतविजेत्या गर्बीन मुगुरूझाला यंदा अंतिम लढतीत कॅरोलीन वोझनियाकीशी सामना होण्याची शक्यता आहे.
The reigning champion from Spain, @GarbiMuguruza, returns to #Wimbledon with a title to defend.
— Wimbledon (@Wimbledon) June 29, 2018
According to ranking, this is who she'll have to beat to do it... pic.twitter.com/rcE7Mm593m